मुंबई -आर्थिक गुन्हे शाखेने मंगळवार ( दि.31) रोजी मुंबईत मोहित कंबोज ( Mohit Kambhoj ) यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या कंपनीने तब्बल 52 कोटींचे कर्ज बुजवल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. आज मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा देत मोहित कंबोज ( Mohit Kambhojj Get Relief From Mumbai Session Court ) यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मोहित कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र, त्यांनी सर्व आरोप फेटाळले होते. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेने मोहित कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालयाने मोहित कंबोज यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
काय आहेत कंबोजवर आरोप -मोहित कंबोज यांच्या कंपनीने 2011 ते 2015 या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून 52 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण हे पैसे ज्या कारणासाठी घेतले होते, त्याऐवजी इतरत्र वळवण्यात आले. नंतरच्या काळात कंपनीने हे कर्ज बुडवले. या प्रकरणात मोहित कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता गुन्हा दाखल झाल्यामुळे मोहित कंबोज यांच्याविरुद्धच्या कारवाईचा वेग वाढू शकतो. हा कंबोज आणि भाजपसाठी धक्का ठरू शकतो. मोहित कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र कंबोज यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मोहित कंबोज यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विट केला आहे. मुंबई पोलिसांनी माझ्यावर एक गुन्हा दाखल केल्याचे समजते. 2017 मध्ये बंद झालेल्या कंपनीसंदर्भात हा गुन्हा दाखल झाला आहे. त्या कंपनीतील बँक व्यवहारासंदर्भातील त्रुटी शोधून माझ्याविरोधात बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे, न्यायालयात जाऊन या सगळ्याविरोधात कायदेशीररित्या दाद मागेन असे कंबोज यांनी सांगितले.