मुंबई - वडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या मयूर पाटील या शिपायाने तरुणीवर हल्ला करणाऱ्या प्रियकराचा वार स्वतःच्या हातावर ओढवून घेतला ( Mumbai Police Save Girl Life ) आहे. यामध्ये मयूर पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु ( Constable Mayur Patil Injure In Wadala ) आहेत. मात्र, मयूर पाटील यांनी केलेल्या या कामगिरीमुळे रियल लाईफमधील सिंघमचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Mumbai Police Save Girl Life : मुंबई पोलिसांतील सिंघम; स्वत: वार झेलत वाचवला तरुणीचा जीव
वडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत काम करणाऱ्या मयूर पाटील या शिपायाने तरुणीवर हल्ला करणाऱ्या प्रियकराचा वार स्वतःच्या हातावर ओढवून घेतला ( Mumbai Police Save Girl Life ) आहे.
Mumbai Police Save Girl Life
ही घटना वडाळा येथे घडली आहे. वडाळ्यातील बरकत अली नाका येथे अनिल बाबर ( 31 वर्षे ) हा आपला प्रियसीवर चाकू हल्ला करण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा तरुणी इकडे तिकडे धावत होती. हे पाहून पोलीस शिपाई मयूर पाटील यांनी मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये बचावासाठी आलेले मयूर पाटील हे जखमी झाले आहेत. त्यांच्या हातावर जखम झाल्याने रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, या हल्ल्यात तरुणीचे प्राण वाचले आहे.
TAGGED:
मुंबई पोलीस मयूर पाटील जखमी