महाराष्ट्र

maharashtra

मुंबई महापालिका करणार खड्डे बुजवल्याची खात्री, चार अभियंत्यांची नेमणूक

महापालिकेने खड्डेमुक्त मुंबईसाठी ‘खड्डा दाखवा आणि ५०० रुपये कमवा’ ही योजना सुरु केली... यानंतर आलेल्या तक्रारींवर कार्यवाही करून प्रशासनाने खड्डे बुजवले.. मात्र कामाची खात्री करण्यासाठी पालिका चार अभियंत्यांची नेमणूक करणार आहे...

By

Published : Nov 8, 2019, 9:21 AM IST

Published : Nov 8, 2019, 9:21 AM IST

मुंबई महापालिका खड्डे बुजवल्याची खात्री करणार

मुंबई -महापालिकेने खड्डेमुक्त मुंबईसाठी १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ‘खड्डा दाखवा आणि ५०० रुपये कमवा’ ही योजना सुरू केली होती. या योजनेत पहिल्या सात दिवसात १६७० तक्रारी दाखल झाल्या. यातील ९१ टक्के तक्रारींवर २४ तासात कार्यवाही करून प्रशासनाने खड्डे बुजवले आहेत. दरम्यान, झालेल्या कामाची खात्री करण्यासाठी पालिका सर्व तक्रारदारांना फोन करून खड्डा बुजला का याची खात्री करणार आहे. त्यासाठी पालिकेच्या रस्ते विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या ट्रॅफिक विभागाच्या चार अभियंत्यांची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा... सावधान! रेल्वे रूळ ओलांडाला तर ‘यमदूत’ उचलून नेणार

पालिकेने मुंबईत ‘रस्त्यावर खड्डा दाखवा, ५०० रुपये मिळवा’ असा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये पालिकेच्या अ‍ॅपवर तक्रार नोंदवल्यानंतर २४ तासात खड्डा बुजवला गेला नाही तर तक्रारदाराला ५०० रुपये बक्षिस संबंधित अधिकाऱ्यांच्या खिशातून दिले जाईल, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. कंत्राटदार-अधिकार्‍यांकडून रस्त्यांची कामे दर्जेदार व्हावीत, टिकावू-मजबूत रस्ते बनावेत यासाठी खड्डा बुजवला नाही तर खड्ड्याच्या तक्रारदारांना देण्यात येणारे ५०० रुपये संबंधित वॉर्ड अधिकारी आणि कंत्राटदाराच्या खिशातून दिले जाणार आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

हेही वाचा... विक्रोळीतील कन्नमवार नगरात घरफोडी, १ लाखाहून अधिक सोन्याचा ऐवज लंपास

पहिल्या सहा दिवसांत १६७० तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील ९१ टक्के तक्रारीवर २४ तासात प्रशासनाने कार्यवाही केली असून ९ टक्के खड्डे बुजवता आले नसल्याचे प्रशासनाने स्थायी समितीत माहिती देताना स्पष्ट केले. मात्र जे खड्डे २४ तासात बुजवता आलेले नाही, अशा खड्ड्यांच्या तक्रारदारांना ५०० रुपये मिळाले का, किती जणांना मिळाले. कारण अनेकांनी याबाबत कुठे विचारणा करावी याची माहिती नाही. त्यांना ५०० रुपये बक्षिस मिळालेले नाही, अशा तक्रारी आहेत. याबत प्रशासनाने स्पष्ट करावे, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली होती. यावर उत्तर देताना काही तांत्रिक बाबींमुळे ९ टक्के खड्डे वेळेत बुजवता आले नाहीत. मात्र यापुढे २४ तासांत खड्डे बुजवले जातील, असा दावा रस्ते विभागाचे मुख्य अभियंता संजय दराडे यांनी केला.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details