महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई महापालिका निवडणूक - प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना प्रसिद्ध

मुंबईत आता प्रभागांची संख्या 236 इतकी झाली आहे. 236 प्रभागांसाठी पालिकेने हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता. पालिकेच्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाला मान्यता दिली असून त्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक - प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना प्रसिद्ध
मुंबई महापालिका निवडणूक - प्रभाग रचनेबाबत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना प्रसिद्ध

By

Published : May 14, 2022, 6:33 AM IST

मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेने प्रभाग पुनर्रचना केली होती. यावरून भाजपाकडून टीका करण्यात आली होती. मात्र आता महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगाने स्वीकारली आहे. त्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामुळे आता पालिकेच्या निवडणुकीत 236 प्रभाग असणार हे स्पष्ट झाले आहे.

पालिकेत प्रभाग वाढले -मुंबई महानगरपालिकेत 227 प्रभाग आहेत. या प्रभागात प्रत्येकी एक प्रमाणे 227 नगरसेवक निवडून येतात. फेब्रुवारी 2017 ला महापालिका निवडणूक झाली होती. 9 मार्चला महापौर निवड झाली. मार्च 2022 मध्ये पालिकेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपला. मात्र कोरोनाचा प्रसार आणि ओबीसी आरक्षण अशा कारणामुळे पालिकेची निवडणूक वेळेवर होऊ शकलेली नाही. कार्यकाळ संपल्याने 8 मार्च 2022 ला पालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे.

अधिसूचना प्रसिद्ध -मुंबईमधील लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने पालिकेचे प्रभाग 9 ने वाढवले. यामुळे पालिकेच्या प्रभागांची संख्या 236 इतकी झाली आहे. 236 प्रभागांसाठी पालिकेने हरकती व सूचना मागवल्या होत्या. त्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला होता. पालिकेच्या प्रभाग रचनेला निवडणूक आयोगाला मान्यता दिली असून त्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

असा होणार फायदा -निवडणूक आयोगाने 236 प्रभागांच्या रचनेला मान्यता दिली आहे. यामुळे येत्या निवडणुकीत 236 प्रभाग असणार हे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने 236 प्रभाग रचनेबाबत अधिसूचना काढल्याने त्यानुसार महिला, अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यांचे आरक्षण काढणे पालिकेला शक्य होणार आहे.

हेही वाचा - BMC Work Going Slow Swing : 'प्रशासकांच्या कार्यकाळात पालिकेचे कामकाज संथ गतीने! 368 प्रस्ताव रखडले', आयुक्त म्हणाले...

ABOUT THE AUTHOR

...view details