मुंबई -पालिका प्रशासनाने यंदा कर्मचाऱ्यांच्या दिवाळी सानुग्रह अनुदानात कोणतीही वाढ न करता मागील वर्षी प्रमाणेच यंदा 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान (बोनस) देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिका प्रशासनाने याबाबतचे परिपत्रक काढले आहे.
पालिकेत सुमारे 1 लाख 11 हजार कर्मचारी काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना पालिका दरवर्षी दिवाळी भेट म्हणून सानुग्रह अनुदान देत आहे. दरवर्षी या सानुग्रह अनुदानात पालिका प्रशासन वाढ करत असते. मात्र, यंदा सानुग्रह अनुदानात कोणतेही वाढ न करता गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही 15 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.