मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पाच जून रोजी धमकीचे ( actor Salman Khan threat letter ) पत्र मिळाले होते. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई क्राइम ब्रांच पालघरमध्ये दाखल ( Mumbai Crime Branch investigation ) झाली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित व्यक्ती ( Mumbai crime branch in Palghar ) दिसला होता. तोदेखील पालघरला गेला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालघरमध्ये मुंबई पोलीस चौकशी करण्याकरिता दाखल झाली आहे.
गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड ( Vikram Brar in Salman threat case ) यानेच हे धमकीचे पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान ( Salman Khans father Salim Khan ) यांच्यापर्यंत पोहोचविले होते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सलमान खानला मिळालेल्या धमकी पत्राची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे. राजस्थानमधील जलोरामधून आलेले तीन संशयित पालघरमध्ये ( suspect seen in CCTV footage ) थांबले होते. याची माहिती मिळवण्सासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या वडिलांना ज्याठिकाणी धमकीचे पत्र मिळाले.
सीसीटीव्हीमध्ये दिसला संशयित-त्या जागेच्या मागे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित दिसत आहे. त्याची ओळख अद्याप क्राईम ब्रांचने सांगितलेली नाही. मात्र यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये पोहोचली आहे. पोलिसांना संशय आहे की सीसीटीव्हीमध्ये दिसणारा संशयित त्या लोकांपैकीच एक आहे. पण तो देशाबाहेर फरार असल्याची चर्चा असते. विक्रम बराड हा राजस्थानमधला कुख्यात गुंड आहे. त्याचे एन्काउंटरमध्ये मारलेल्या गेलेल्या कुख्यात गुंड आनंद पाल याचा भाऊ अनमोलसोबतही संबंध आहेत अशी देखील माहिती समोर आली आहे. दरम्यान पोलिसांकडून विक्रम बराडला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
विक्रम बराड हा भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत- विक्रम बराड हा भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशीदेखील माहिती समोर आली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना रविवारी 5 जून रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू अशी धमकी त्याला देण्यात आली होती. या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची एक टीम तात्काळ दाखल झाली होता. ज्या ठिकाणी धमकीचे पत्र मिळाले त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरू होता. सलमान स्वत घराबाहेर येऊन क्राईम ब्राँचच्या टीमला सहकार्य करताना दिसला होता.