मुंबई -गतसाली मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. १६ नोव्हेंबरला रुग्ण संख्या ४०९ पर्यंत खाली आली होती. आज (सोमवारी) मुंबईत ५१६ नवे रुग्ण आढळून आले असून ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही महिन्यात सर्वात कमी मृतांची आज नोंद झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
६ हजार ९४३ सक्रिय रुग्ण -
मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ लाख ९४ हजार ९८५ वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा ११ हजार १३८ वर पोहोचला आहे. मुंबईमधून आज ५७० रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा २ लाख ७६ हजार ३४ वर गेला आहे. सध्या मुंबईत ६ हजार ९४३ सक्रिय रुग्ण आहेत.