मुंबई : वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबईमध्ये मुंबई कॉंग्रेस तर्फे आंदोलन ( Mumbai Congress agitation against inflation ) करण्यात आले. याप्रसंगी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. दादर पूर्व येथील विभागात हे आंदोलन करण्यात आले. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप ( Mumbai Congress President Bhai Jagtap ) यांच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनामध्ये मंत्री अस्लम शेख ( Minister Aslam Sheikh ), त्याचबरोबर काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
महागाईवर मोदी सरकारची चुप्पी-केंद्र सरकारकडून केल्या जात असलेल्या कृत्रिम महागाईविरोधात काँग्रेसने 31 मार्च पासून आंदोलनाचा सप्ताह सुरू केला आहे. यासाठी आज मुंबईमध्ये मुंबई कॉंग्रेस तर्फे मोठ्या प्रमाणामध्ये महागाईविरोधात विशेष करून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आले. या प्रसंगी बोलताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप म्हणाले ( Bhai Jagtap on rising inflation ) की, पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेल, जीवनावश्यक वस्तूंचे दर हे आता सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. सामान्य लोकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यासाठी हे तीव्र आंदोलन करण्यात येत आहे.