महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव 'नाना शंकरशेठ टर्मिनस' होणार

“नाना शंकरशेठ यांची २६ फेब्रुवारीला जयंती असून त्याआधीच ही प्रक्रिया झाली तर आनंदच असेल,” असे अरविंद सावंत म्हणाले आहेत. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येणार आहे.

By

Published : Jan 7, 2021, 12:33 AM IST

Mumbai Central Railway Station will be renamed as 'Nana Shankarsheth Terminus'
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार

मुंबई - राज्यात नामांतराच्या चर्चेला जोर असताना मुंबईतील एका रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार आहे. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे नामांतर ‘नाना शंकरशेठ टर्मिनस’ होणार असल्याची माहिती शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.

मुंबई सेंट्रल स्थानकाचे नाव 'नाना शंकरशेठ टर्मिनस' होणार

हेही वाचा - औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय

राय यांनी याबाबत प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली असून सकारात्मक पत्र मिळाले आहे. “नाना शंकरशेठ यांची २६ फेब्रुवारीला जयंती असून त्याआधीच ही प्रक्रिया झाली तर आनंदच असेल,” असे अरविंद सावंत म्हणाले. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. केंद्र सरकारच्या मान्यतेनंतरच प्रत्यक्ष नामांतर करता येणार आहे.

शिवसेना खासदार अरविंद सावंत

औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय?

औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावरुन अनेक वाद उफाळून आले आहेत. महाविकास आघाडीतील काँगेस आणि शिवसेनेचे नेतेदेखील एकमेकांशी भिडले आहेत. अरविंद सावंत यांनी औरंगजेब तुमचा आदर्श आहे काय? असा सवाल काँग्रेस नेत्यांना केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details