मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वतःचाच विक्रम मोडला Mumbai airport handles record number of passenger आहे. याठिकाणी १७ सप्टेंबर रोजी २४ तासांमध्ये तब्बल १ लाख ३० हजार इतकी प्रवासी वाहतूक हाताळली आहे.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेल्या काही काळात नवीन ठिकाणे, वाढत्या उड्डाणांच्या हालचाली आणि विमानसेवेच्या क्षमतेत झालेली वाढ यामुळे वाहतूक वाढली आहे. विमानतळ प्रशासनाने CSMIA ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "टर्मिनल 2 (T2) मधून जवळपास 95,080 प्रवाशांनी प्रवास केला आणि या दिवशी 35,294 प्रवाशांनी टर्मिनल 1 (T1) मधून प्रवास केला. एकूण 839 उड्डाणे विमानतळावरून झाली.
इंडिगो विस्तारा आणि गो फर्स्टने देशांतर्गत मार्गांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक केली. आंतरराष्ट्रीय म्हणून, इंडिगो, एअर इंडिया आणि एमिरेट्स हे टॉप 3 मध्ये होते. दिल्ली, बेंगळुरू आणि चेन्नई ही टॉप 3 देशांतर्गत ठिकाणे होती. तर दुबई, अबू धाबी आणि सिंगापूर हे सर्वाधिक हवाई वाहतूक असलेले टॉप 3 आंतरराष्ट्रीय मार्ग राहिले.
रेटिंग एजन्सी इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड (ICRA) Investment Information and Credit Rating Agency च्या मते, देशांतर्गत वाहतूक ऑगस्ट 2022 मध्ये 5 टक्क्यांनी वाढून 1.02 कोटी झाली आहे, हे दर्शविते की विमान वाहतूक उद्योग फ्लाइट ऑपरेशन्समध्ये सामान्य स्थितीसह पुनर्प्राप्तीच्या मार्गावर icra released data of mumbai airport आहे.