मुंबई - लक्षद्वीप भारताचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जो कोणता निर्णय घेतला जाईल तो स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच घेतला पाहिजे. विकासाला विरोध नाही परंतु कायदा आणि नियम सर्वांना एक सारखे आहेत. तिथे जर विचार करून पावले उचलली नाहीत तर सर्वात मोठ्या असंतोषाला सामोरे जावे लागणार आहे. या असंतोषाचे परिणाम देशाला भोगावे लागतील. तसेच अशा केंद्रशासित प्रदेशात जर कोणी धार्मिक उन्माद घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतील तर ते चुकीचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
'..तर लक्षद्वीपमधील असंतोषाचे परिणाम देशाला भोगावे लागतील'
लक्षद्वीप भारताचा अत्यंत संवेदनशील भाग आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जो कोणता निर्णय घेतला जाईल तो स्थानिक लोकांना विश्वासात घेऊनच घेतला पाहिजे. तिथे जर विचार करून पावले उचलली नाहीत तर सर्वात मोठ्या असंतोषाला सामोरे जावे लागणार आहे. या असंतोषाचे परिणाम देशाला भोगावे लागतील, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
नरेंद्र मोदींनी हुकुमाची पानं टाकावी..
छत्रपती संभाजीराजे हे महाराष्ट्रातील एक सन्माननिय नेते आहेत. त्यांची भूमिका आणि संताप सरकारने समजून घेणे गरजेचे आहे आणि सरकार समजून घेतयं. ते सर्व नेत्यांना भेटले आहेत परंतु सर्वात प्रमुख भेट ही नरेंद्र मोदींची असली पाहिजे. मराठा आरक्षणाचा प्रश्न हा आता राज्याच्या हातात राहीलेला नाही. आम्ही सगळे छत्रपती संभाजीराजे यांच्या मतांशी सहमत आहोत. नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये हुकुमाचे पान आहेत त्यांनी ती टाकावी आणि निर्णय घ्यावा, असेही संजय राऊत म्हणाले.