मुंबई - कोरोना संकटापासून जनतेला वाचवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांना जीवनावश्यक वस्तू आणि सुरक्षा किटचे वाटप करून खासदार राहुल शेवाळे यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. दक्षिण-मध्य मुंबईतील सर्व पोलीस स्थानकांमधील एकूण 4500 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना अन्नधान्य, सुरक्षा किट आणि इतर वस्तू असणाऱ्या जीवनावश्यक किट्स देण्याच्या कार्याला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. खासदार शेवाळे यांच्या या आपुलकीच्या कृत्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी भारावून गेले.
खासदार राहुल शेवाळेंकडून पोलिसांना जीवनावश्यक वस्तू आणि सुरक्षा किटचे वाटप हेही वाचा...लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघात एकूण 17 पोलीस स्थानके, 7 वाहतूक पोलीस चौक्या आहेत. याठिकाणी, शिपाई ते वरिष्ठ अधिकारी या पदापर्यंत सुमारे साडे चार हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत आहेत. आपल्या जीवाची पर्वा न करता, मुंबईकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे आणि 'अक्षय पात्र' यांनी पुढाकार घेतला आहे.
कोरोना संकटात पोलीस बांधवांना सर्वतोपरी सहाय्य करण्याचा प्रयत्न खासदार राहुल शेवाळे यांनी नेहमीच केला आहे. त्यांच्या मागणीनुसारच, कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारासाठी, वांद्र्याचे 'गुरुनानक रुग्णालय' राखीव ठेवण्यात आले. तसेच खासदार शेवाळे यांच्यावतीने दक्षिण-मध्य मुंबईतील सर्व पोलीस स्थानके आणि पोलीस वसाहतींचे निर्जंतुकीकरण, पोलिसांना मास्क-सॅनिटायझरचे वाटप, पाण्याचे वितरण अशा अनेक माध्यमातून करण्यात आलेल्या सहकार्यामुळे पोलीस बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.
हेही वाचा...'त्या' कैद्यामुळे आर्थर रोड कारागृहातील 150 जणांची कोरोना चाचणी