मुंबई - १७ व्या लोकसभेसाठी मुंबईतील सहाही जागेसाठी मतदान पार पडले. विक्रोळी, घाटकोपरमध्ये मतदारांची संख्या मोठ्या संख्यने दिसून येत होती. दरम्यान, घरी बाळाला बघायला कोणी नाही, म्हणून एक माता चक्क त्याला घेऊन मतदान करायला आली.
विक्रोळीमध्ये मतदानाचा उत्साह; बाळाला कडेकर घेऊन मातेने बजावला मतदानाचा हक्क
केंद्रात व्यवस्था नसल्यामुळे मुलांना घेऊन मतदान करण्याची वेळ मातेवर आली.
मुबंईतील काही मतदार केंद्रांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, काही केंद्रात व्यवस्था नसल्यामुळे मुलांना घेऊन मतदान करण्याची वेळ मातेवर आली. विक्रोळी कन्नमवार नगर घाटकोपरमधील रमाबाई नगर हा विभाग आंबेडकरी बालेकिल्ला म्हणून ओळखले जातो. या भागात वंचित बहुजन आघाडीला कल दिसून आला आहे. तर काही ठिकाणी घड्याळाचा बोलबाला दिसून आला. मराठी भागात भाजपला शिवसेनेवर अवलंबून राहावे लागणार आहे. तर मनसेनेही राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी जोर लावला आहे. सकाळपासूनच विक्रोळीच्या मतदान केंद्रावर मतदारांची रांग लागली होती.