स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राला खास भेट
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेक स्पर्धेत एकमेव सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याला अनोख्या पद्धतीच्या शुभेच्छा देण्यासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जे.जे. आर्टचा विद्यार्थी व प्रसिद्ध मोझ्यक कलाकार चेतन राऊत याने २१,००० पुश पिन्सच्या माध्यमातून ४ फुट लांब व ४ फुट रुंदीचे मोझ्यक पोर्ट्रेट तयार केले आहे.
Mosaic portrait of Olympic gold medalist Neeraj Chopra
मुंबई -टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला भालाफेक स्पर्धेत एकमेव सुवर्णपदक मिळवून देत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या नीरज चोप्रावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भालाफेक स्पर्धेत त्याने एक अतुल्य कामगिरी करत, विरोधी स्पर्धकांना धूळ चारत सुवर्णपदक मिळवले. त्यामुळे संपूर्ण देशाला एक मोठ्या आनंदाचा क्षण अनुभवता आला. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर बक्षिसांचा वर्षाव होत आहे.
Last Updated : Aug 14, 2021, 5:40 PM IST