महाराष्ट्र

maharashtra

मुंबई कोरोना अपडेट, 871 नवे रुग्ण, 16 रुग्णांचा मृत्यू

मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 871 नवे रुग्ण आढळून आले असून 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 3 महिला रुग्ण आहेत.

By

Published : Nov 18, 2020, 10:31 PM IST

Published : Nov 18, 2020, 10:31 PM IST

मुंबई
मुंबई

मुंबई- शहर परिसरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत वाढ होत होती. मात्र, गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज नव्या 871 रुग्णांची नोंद झाली असून 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 320 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

8 हजार 658 सक्रिय रुग्ण -

मुंबईत आज (बुधवारी) कोरोनाचे 871 नवे रुग्ण आढळून आले असून 16 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 13 पुरुष तर 3 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 71 हजार 525 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 612 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1372 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 48 हजार 711 वर गेला आहे. सध्या मुंबईत 8 हजार 658 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 320 दिवसांवर -

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 320, दिवस तर सरासरी दर 0.22 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 444 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 4 हजार 905 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 17 लाख 07 हजार 237 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

या आधी कमी नोंद झालेली रुग्णसंख्या -

7 नोव्हेंबर 576 रुग्ण
2 नोव्हेंबर 706 रुग्ण
3 नोव्हेंबर 746 रुग्ण
6 नोव्हेंबर 792 रुग्ण
9 नोव्हेंबर 599 रुग्ण
10 नोव्हेंबर 535 रुग्ण
14 नोव्हेंबर 574 रुग्ण
16 नोव्हेंबर 409 रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details