मुंबई -गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना आणि ओमायक्रोनचा संसर्ग ( Omicron Patient Increased In Maharashtra ) वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेत सुद्धा कोरोनाचा ( Railway Employee Tested Corona Positive ) शिरकाव झालेला आहे. पश्चिम रेल्वेवेत 347 आणि मध्य रेल्वेत 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बांधा झाली आहे. त्यामुळे पश्चिम-मध्य रेल्वेमध्ये खळबळ उडाली असून रेल्वे प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची त्यांच्या कुटुंबाची पुरेपूर काळजी घेण्यात येत आहे.
रेल्वेत बाधितांची संख्या वाढते-
मुंबईत दरदिवशी हजारोंच्या संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्य सरकारद्वारे सरकारी आणि खासगी कार्यालयांना 'वर्क फ्रॉम होम' आणि दिवसाआड काम करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, अद्याप रेल्वेचे काही विभाग सोडल्यास उर्वरित सर्व विभागात 100 टक्के कर्मचारी वर्ग काम करत आहे. परिणामी, कोरोनाची साखळी मजबूत होण्यास मदत होत आहे. सध्या रेल्वेच्या प्रत्येक वर्कशॉप, विभागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना कोरोनाची बाधा होत आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने पश्चिम रेल्वेच्या वर्कशाॅपमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली जात आहे. यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. महालक्ष्मी वर्कशाॅपमध्ये 578 जणांची चाचणी केली असता, 194 कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले आहेत. लोअर परळ वर्कशाॅपमध्ये 514 जणांची चाचणी केली असता, 145 कोरोना पाॅझिटिव्ह मिळाले आहेत. याशिवा लोअर परळ डिस्पेसरीमधील 8 जण कोरोना पाॅझिटिव्ह सापडून आले आहे. तर मध्य रेल्वेवर जवळ जवळ 200 कर्मचारी कोरोनाची लागण झाली आहे.