महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 7, 2020, 10:38 PM IST

ETV Bharat / city

शिवाजी महाराज स्थानकाबाहेर व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या आठ फुटी राक्षसाचे दहन

मुंबईत शिवाजी महाराज स्थानकाबाहेर होळिनिमित्त व्यसन मुक्तीचा संदेश देणाऱ्या राक्षसाचे दहण करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी व्यसनांच्या राक्षसांचे दहन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

monster-of-the-addiction-free-message-burst-out-of-the-cst-station
शिवाजी महाराज स्थानका बाहेर व्यासनमुक्तीचा संदेश देणाऱ्या आठ फुटी राक्षसाचे दहण

मुंबई - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाबाहेर होळीनिमित्त महाराष्ट्र नशाबंदी मंडळ आणि सिध्दार्थ महाविद्यालयाच्या विद्यमाने होळीच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात दारू, गुटखा, सिगारेट, अमली मदार्थ, गांजा, अफू, गर्द, ड्रग्ज, चरसच्या वेष्ठनांच्या आठ फुटी राक्षसाचे प्रतिकात्मक दहन करण्यात आले. या वेळी कार्यकर्त्यांनी व्यसनांच्या राक्षसाचे दहन करण्याचे आवाहन नागरिकांना केले.

शिवाजी महाराज स्थानका बाहेर व्यासनमुक्तीचा संदेश देणाऱ्या आठ फुटी राक्षसाचे दहण

हेही वाचा - 'या'मुळे होत नाही कोरोना - डॉ. अजित रानडे

यावेळी सामजातील व्यसनांचा समूळ नाश होऊन निर्व्यसनी मुंबई आणि महाराष्ट्राचे स्वप्न साकार व्हावे, अशी कार्यक्रमा मागील अपेक्षा असल्याचे वर्षा विद्या विलास म्हणाल्या. या ठिकाणी सिध्दार्थ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाट्यातून व्यासनमुक्तीचा संदेश देण्यात आला. या वेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

हेही वाचा - महिलांवरील अत्याचारात वाढ; विनयभंग, हुंडा बळींची संख्या घटली

ABOUT THE AUTHOR

...view details