मुंबई - पश्चिम रेल्वेवरील वांद्रे स्थानकात एका प्रवाशाचा मोबाईल चोरून पळून जाणाऱ्या एका चोरट्याला आरपीएफ पोलिसांनी धावून रंगेहात पकडलेले आहे. ही संपूर्ण घटना रेल्वे स्थानकांवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाली आहेत. आरपीएफ पोलिसांनी या चोराला पुढील कारवाईसाठी वांद्रे लोहमार्ग पोलीसाकडे सुपुर्द केले आहेत.
मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकावर मोबाईल चोराला रंगेहात पकडले!
सोमवारी सकाळी सहा वाजता पश्चिम रेल्वेवरून गोरेगाव लोकलमधून मालाड येथील रहिवासी काशिनाथ जाधव प्रवास करत होते. तेव्हा वांद्रे स्थानकात लोकल दाखल होताच, धावत्या लोकल मधून चोराने काशिनाथ यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळू लागला. तेव्हा प्रवासी काशिनाथ जाधव यांनी सुद्धा फलाटावर उडी घेतली.
आरपीएफ पोलिसांनी चोराला पकडले - रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी सहा वाजता पश्चिम रेल्वेवरून गोरेगाव लोकलमधून मालाड येथील रहिवासी काशिनाथ जाधव प्रवास करत होते. तेव्हा वांद्रे स्थानकात लोकल दाखल होताच, धावत्या लोकल मधून चोराने काशिनाथ यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून पळू लागला. तेव्हा प्रवासी काशिनाथ जाधव यांनी सुद्धा फलाटावर उडी घेतली. उडी घेत असताना काशिनाथ जाधव यांना थोडी दुखापत झाली. तरीही जोराने चोर असे ओरडून चोराच्या मागे पळत सुटले होते. तेव्हा कर्तव्यावर असलेले आरपीएफ कर्मचारी शंकर लाल वर्मा, शैलेश उपाध्याय आणि छोटूलाल चाटे यांनी त्वरित जोर आला पादचारी पुलावरून उतरतांना पकडले.
सीसीटीव्हीत घटना कैद - आरपीएफ पोलिसांनी चोराची चुकून चौकशी केली असता माहीम येथे राहत असून इरफान समीर कुरेशी असं आरोपीचे नाव सांगितले जात आहे. त्यांच्याकडून काशिनाथ यांचा 15 हजार 700 रुपयांचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला आहेत. , त्यानंतर आरोपीची पुढील चौकशीसाठी वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्याला पाठवण्यात आले. चोराला पकडण्याची संपूर्ण घटना स्थानकावर लागलेल्या विविध सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. सध्या चोराला पकडण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसून येत आहे.