महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शिवसेना, भाजपमधील नाराजांवर मनसेची नजर

शिवसेना, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. यामुळे या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. तसेच उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीच्या तयारीत देखील असल्याच्या चर्चा आहेत. अशा वेळेला हे नेते आणि त्यांचं असलेलं जाळं मनसेच्या मदतीला येणार आहे. या नेत्यांना मनसेचे पाठबळ मिळाल्यावर त्यांना मनसेच्या मतांची मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

मुंबई

By

Published : Sep 26, 2019, 8:06 PM IST

मुंबई- मनसेमधील नेते मोठ्या प्रमाणात सोडून गेले आहेत. निवडणूक तोंडावर आली असतानाही निवडणुकीच्या दृष्टीने मनसेशी पुरेशी तयारी झाली नाही. अशा वेळेला शिवसेना, भाजपमधील नाराज नेत्यांना आपल्या पक्षात आणून त्यांना उमेदवारी देण्याची तयारी मनसे करत आहे. तसे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या निकटवर्तीयांना दिल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

हेही वाचा - राज्यातील नातेमय राजकारणाचे 'सासरे-जावई' कनेक्शन...

शिवसेना, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू आहे. यामुळे या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. तसेच उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरीच्या तयारीत देखील असल्याच्या चर्चा आहेत. अशा वेळेला हे नेते आणि त्यांचं असलेलं जाळ मनसेच्या मदतीला येणार आहे. या नेत्यांना मनसेचे पाठबळ मिळाल्यावर त्यांना मनसेच्या मतांची मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ

एक मोठे आव्हान शिवसेना भाजपला देण्याचा मनसे प्रयत्न करत आहे. शिवसेना, भाजपचे नेते मनसेकडे आल्यास मनसेचे मतदार शिवसेना भाजपमधील आलेल्या उमेदवारांना मतदान करु शकतात. पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून आलेल्या अनेक उमेदवारांसमोर अनेक उमेदवारांची मते खातील, अशी स्थिती आहे. यामुळे यंदा निवडणुकीत एक नवीन आव्हान समोर उभे राहणार आहे. त्याचा फायदा काही वेळा विरोधकांना होणार आहे. ही त्यामागची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details