महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईतील निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांविरोधात मनसेचे 'बनाना राईड' आंदोलन

मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे काही मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. मात्र दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. हाच मुद्दा आता मनसेने उचलून धरला आहे. महापालिकेच्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या विरोधात त्यांनी आज जोरदार आंदोलन केले. एक केळ पाण्यात सोडून त्याला दोरा बांधण्यात आला.

mns-banana-ride-agitation
mns-banana-ride-agitation

By

Published : Sep 22, 2021, 4:57 PM IST

Updated : Sep 22, 2021, 5:12 PM IST

मुंबई -मुंबई पालिकेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे. मुंबई आणि मुंबईच्या रस्त्यावरील खड्डे हे प्रसिद्ध आहे. दर पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडतात ही स्थिती अनेक वर्षापासून कायम आहे. कांजूरमार्ग येथील मनसुख नाका भागामध्ये पालिकेकडून 8 कोटी खर्च करून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र हा रस्ता निकृष्ट दर्जाचा निघाला. याविरोधात आज मनसे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली "बनाना राईड"आंदोलन करण्यात आले.

निकृष्ठ दर्जाच्या रस्त्यांविरोधात मनसेचे आंदोलन
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे काही मुंबईकरांसाठी नवीन नाहीत. मात्र दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांमुळे मुंबईकर त्रस्त आहेत. हाच मुद्दा आता मनसेने उचलून धरला आहे. महापालिकेच्या रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप मनसेने केला आहे. या विरोधात त्यांनी आज जोरदार आंदोलन केले. एक केळ पाण्यात सोडून त्याला दोरा बांधण्यात आला.

हे ही वाचा -भारतात नोव्हेंबरपर्यंत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता - डॉ. अविनाश भोंडवे

.. तर तीव्र आंदोलन करू, मनसेचा इशारा -

काही महिन्यापूर्वी मनसुख नाका येथे महानगरपालिकेच्या वतीने कलवट बनवण्यात आला होता. यासाठी तब्बल साडेआठ कोटीचा निधी वापरण्यात आला होता. मात्र इतका निधी खर्च करून सुद्धा या रस्त्यावर पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. यामुळे अनेक अपघात होत आहेत. हे काम केलेल्या ठेकेदार व पालिका अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे. 15 दिवसाच्या आत जर यांनी काम सुधारले नाही आणि कारवाई केली नाही तर यापेक्षा जोरदार आंदोलन आम्ही करणार आहोत, असे मनसे उपाध्यक्ष विनोद शिंदे यांनी सांगितले.

Last Updated : Sep 22, 2021, 5:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details