महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मनसेकडून मध्य रेल्वेला अल्टिमेटम, समस्या न सोडवल्यास 'खळ्ळ खट्याक' चा इशारा

अमित ठाकरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मनसेकडून मध्य रेल्वेच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. रेल्वेकडून प्रवाशांच्या समस्यांची सोडवणूक न केल्यास मनसेकडून 'खळ्ळ खट्याक' चा इशारा यावेळी देण्यात आला.

By

Published : Jul 9, 2019, 5:38 PM IST

अमित ठाकरे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट

मुंबई - मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित राज ठाकरे यांनी आज त्यांच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयात भेट दिली. यावेळी रेल्वेच्या विविध समस्यांबाबत मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक आर. बद्री नारायण यांना मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

अमित ठाकरे यांची मनसेच्या शिष्टमंडळासह मध्य रेल्वेच्या मुख्यालयाला भेट

मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात 'रेल्वे स्थानक व प्रवाशांच्या विविध समस्यांचा' पाढा रेल्वे अधिकाऱ्यांसमोर मांडण्यात आला. रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर वाढविण्यात यावे, ज्या ठिकाणी रुळावर पाणी साचते त्या ठिकाणी एलिव्हिटेड मार्ग बांधावा, मध्य रेल्वे स्थानकातील शौचालयाची देखभाल महिला बचतगट यांना देण्यात यावी, तसेच महिलांच्या शौचालयाप्रमाणे पुरुष शौचालयही स्वच्छ ठेवावे आदी विविध प्रश्न यावेळी मांडण्यात आले.

यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे मनसेचे शिष्टमंडळ समाधानी झाले नाही. त्यांनी या समस्या सोडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाला 3 महिन्यांचा कालावधी दिला आहे. "रेल्वेच्या वेळापत्रक वेळेत धावायला पाहिजे, ही आमची माफक अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने येत्या 3 महिन्यांत प्रवाशांच्या समस्या न सोडवल्यास मनसेला आपल्या भाषेत अधिकाऱ्यांना जाब विचारावा लागेल. गरज पडल्यास मनसेकडून 'खळ्ळ खट्याक' भाषेत उत्तर दिले जाईल." अशी प्रतिक्रिया मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details