महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डोंगरी मासळी बाजाराबाहेरील परप्रांतीय मासेविक्रेत्यांना मनसेचा दणका

डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यांच्या मुजोरीमुळे आमचा व्यवसाय मंदावल्याची तक्रार कोळी बांधव-भगिनींनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर मनसेकडून कारवाई करण्यात आली आहे.

By

Published : Oct 6, 2020, 5:51 PM IST

Updated : Oct 6, 2020, 6:01 PM IST

डोंगरी वाडीबंदर मासळी
डोंगरी वाडीबंदर मासळी

मुंबई - डोंगरी वाडीबंदर मासळी बाजाराबाहेर बसणाऱ्या अनधिकृत परप्रांतियांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अवघ्या 24 तासात मनसे स्टाईलने दणका दिला. डोंगरी मासळी बाजाराबाहेर परप्रांतीय मासेविक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. त्यांच्या मुजोरीमुळे आमचा व्यवसाय मंदावल्याची तक्रार कोळी बांधव-भगिनींनी राज ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर मनसेकडून कारवाई करण्यात आली आहे.

कोळी महिलांनी थेट राज ठाकरेंची भेट घेऊन याविषयाकडे लक्ष घालण्याची मागणी केली होती. डोंगरी वाडी बंदराहून आलेल्या कोळी महिलांची राज ठाकरे यांनी कृष्णकुंज निवासस्थानाबाहेर येऊन भेट घेत त्यांची समस्या जाणून ती सोडवण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्याची पूर्ती अवघ्या 24 तासात करण्यात आली आहे. मनसेचे स्थानिक विभागाध्यक्ष संजय नाईक यांनी 24 तासातच बेकायदा मासेविक्री करणाऱ्या मुजोरांना दणका दिला. यामुळे कोळी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोळी महिलांनी राज ठाकरेंना भेटून समस्या सांगितल्या
Last Updated : Oct 6, 2020, 6:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details