मुंबई -एसएनडीटी महिला विद्यापीठाची संलग्न असलेल्या एमपी शहा कॉलेजने हिजाब बंदीचा निर्णय घेतल्याने आता मुंबईत देखील धार्मिक वाद पेटण्याची शक्यता ( MLA Rais Shaikh letter about hijab controversy ) आहे. या नियमांमध्ये दुपट्टा, घुंगट आणि बुरखा घालून कॉलेजमध्ये येऊ शकत नाही, असे कॉलेजने स्पष्ट लिहिले आहे. यामुळे महाविद्यालय प्रशासनाला समज देण्याचे आवाहन समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्राद्वारे ( MLA Rais Shaikh letter to Home Minister ) केले आहे.
काय म्हटले रईस शेख?
"आपल्या निदशर्नास आणू इच्छितो की, महाराष्ट्रातील महिलांच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे मणीबेन एम. पी. शाह वूमन कॉलेजच्या माहिती पत्रकामध्ये देखील विद्यार्थ्यींना हिजाब परिधान करण्याबाबत बंदी आहे. आपल्या माहितीसाठी हे माहिती पत्रक सोबत जोडत आहे. अशाप्रकारे महाराष्ट्रामध्ये इतर शिक्षण संस्थामध्ये देखील विद्यार्थ्यींना हिजाब परिधान करण्याबाबत बंदी असू शकते त्यामुळे सदर बाब ही भेदभावजनक असून धार्मिक तणाव संघर्ष वाढवणारी आहे. तरी प्रत्येकाला भारतीय संविधानानूसार मूलभूत हक्क बहाल केले असून वेश परिधान करण्याचा हा प्रत्येक व्यक्तीचा वैयक्तिक हक्क आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थामध्ये वेश परिधान करण्याबाबत असलेला निर्णय कोणत्याही धर्माच्या भावना दुखावणार व दुजाभाव करणारा असता कामा नये."
रईद शेख यांची गृहमंत्र्यांना विनंती -