महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

..त्यामुळेच नवाब मलिक देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत - अतुल भातखळकर

सीताराम कुंटे यांच्या अहवालावर देवेंद्र फडणवीस यांनी हा अहवाल कुंठे यांनी बनवलाच नाही तो नवाब मलिक किंवा जितेंद्र आव्हाड यांनी बनवला असल्याचा आरोप केला होता. त्यावर नवाब मलिक यांनी पलटवार केला होता. नवाब मलिक यांच्या वक्तव्यावरती भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका करत मंत्री नवाब मलिक हे फसणार आहेत त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचे म्हटले आहे.

mla atul bhatakhalkar
mla atul bhatakhalkar

By

Published : Mar 27, 2021, 2:59 PM IST

मुंबई -राज्याच्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भातला फोन टॅपिंगचा अहवाल राज्य सरकारकडे मांडलेला आहे या अहवालाच्या काही प्रती या बाहेर माध्यमांमध्ये आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल चढवत हा अहवाल सीताराम कुंटे यांनी बनवलाच नाही आहे मी गेली अनेक वर्ष सीताराम कुंटे यांना ओळखतो हा अहवाल मंत्री नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड यांनी बनवलेला आहे त्याच्या वरती फक्त सही ही सिताराम कुंटे यांची आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर नवाब मलिक यांनी त्यांना प्रतिउत्तर दिले आहे. नवाब मलिक यांच्या वक्तव्यावरती भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका करत मंत्री नवाब मलिक हे फसणार आहेत त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असल्याचे म्हटले आहे.

हे ही वाचा - प्रभादेवीत इमारतीला भीषण आग; जीवितहानी नाही
महाराष्ट्र इंटेलिजंट युनिटच्या कमिशनर रश्मी शुक्ला यांनी पोलिसांच्या बदल्यांच्या गैरव्यवहारात संदर्भात फोन टॅपिंगचा अहवाल हा तत्कालीन महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांना दिलेला होता त्यावर कोणतीच कारवाई ही मुख्यमंत्र्यांनी केलेली नाही असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर केला त्यावरती आत्ता सध्या राजकारण सुरू आहे एकीकडे सत्ताधारी विरोधकांवरती आरोप लावत आहेत, की रश्मी शुक्ला या भाजपाच्या एजंट आहेत आणि रश्मी शुक्ला यांनी अनधिकृतपणे नेत्यांचे, आमदारांचे अन्य लोकांचे फोन टॅप केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ती चौकशी आणि कारवाई दोन्ही होणार परंतु भाजप रश्मी शुक्ला यांच्या चौकशी वरती ठाम आहे आणि या सगळ्या प्रकरणा संदर्भात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. या सगळ्या प्रकरणांमध्ये राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एक अहवाल रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात बनवून तो मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे. तो अहवाल सध्या माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. त्यावरती हा अहवाल कोणी फोडला यावर सध्या राजकारण सुरू आहे.

हे ही वाचा - गुलाबशेती वाचवण्यासाठी तयार केले सहा कोटी लीटर क्षमतेचे शेततळे!
सीताराम कुंटे यांनी दिलेला अहवाल हा मंत्री नवाब मलिक यांनी बाहेर लीक केला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. त्यावर मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती प्रतीआरोप लावत हा अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी लीक केलेला आहे आणि ते फसणार आहेत. त्यामुळे ते आपला बचाव करत आहेत, अशी टीका यावेळी त्यांनी केली. या सगळ्या प्रकरणांमध्ये भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या वरती आरोप करत नवाब मलिक हे या सगळ्या प्रकरणामध्ये फसणार आहेत म्हणून ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर ती आरोप लावत आहे, अशी टीका या वेळेस आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details