महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोविडमुळे निवडणुका घेता आल्या नाही, प्रशासकांची नेमणूक जाणीवपूर्वक नाही - नवाब मलिक

कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. परंतु, ज्यांना राज्यसरकार हे जाणीवपूर्वक करत आहे, असे वाटते त्यांनी विविध उच्च न्यायालयांचे आदेश आलेत त्यांचा अभ्यास करावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला.

By

Published : Sep 6, 2021, 7:07 PM IST

mnc election Nawab Malik comment
नवाब मलिक

मुंबई -कोरोना परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्यातील मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुका होतील. परंतु, ज्यांना राज्यसरकार हे जाणीवपूर्वक करत आहे, असे वाटते त्यांनी विविध उच्च न्यायालयांचे आदेश आलेत त्यांचा अभ्यास करावा, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला.

माहिती देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक

हेही वाचा -वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

राज्यात काही महानगरपालिकांची मुदत संपल्यावर कोरोनामुळे निवडणुका घेता आल्या नाहीत तिथे प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना असताना नेमणुकांबाबत हे सरकार जाणीवपूर्वक कुठेही प्रशासक नेमण्याच्या मनस्थितीत नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

जेव्हा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निवडणूका झाल्या त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर विविध न्यायालयांनी राजकीय पक्षांवर बोट ठेवण्याचे काम केले. मुळात याप्रकरणी निवडणूक आयोगाला जबाबदार धरले पाहिजे होते, असेही नवाब मलिक म्हणाले. सरकारला प्रशासकाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था चालल्या पाहिजे, यामध्ये रस नाही. लोकशाहीत निवडून आलेल्या लोकांनी कामकाज केले पाहिजे, परंतु कोरोनामुळे ही परिस्थिती आल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादीच्या आजी - माजी आमदारांची बुधवारी बैठक

२०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झालेल्या व पराभूत झालेल्या उमेदवारांची महत्वाची बैठक बुधवार दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित होती. मात्र, त्यांच्या प्रकृतीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता ही बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत विजयी व पराभूत झालेल्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

हेही वाचा -भाजपा आमदार जय कुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर ईडी कार्यालयात

ABOUT THE AUTHOR

...view details