मुंबई - राज्य विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी २० जूनला निवडणूक होत आहे. गुरुवारी या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. शिवसेनेकडून आज (बुधवारी) नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले. शिवरायांना वंदन करुन सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोन उमेदवारांचे अर्ज भरले आहेत. महाराष्ट्राची, देशाची, जनतेची सेवा करण्यासाठी लवकरच हे आम्हाला विधान परिषदेत ( MLC Election 2022 ) दिसतील, अशी खात्री आहे. मात्र कोण किती जागा लढतो, यावर बोलण्यापेक्षा आम्हाला जनतेची सेवा करायची आहे. याच हेतूने आम्ही अर्ज भरल्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी स्पष्ट केले आहे.
MLC Election 2022 : चांगले काम आणि लोकसेवा करण्यासाठीच आम्ही मैदानात - आदित्य ठाकरे
विधान परिषदेच्या ( MLC Election 2022 ) रिक्त होणाऱ्या जागांवर शिवसेनेकडून सचिन अहिर आणि आमशा पाडवी ( Sachin Ahir and Amsha Padvi MLC candidature Shiv Sena ) या दोन उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहे. आम्हाला कोणाच्या राजकारणात न पडता, लोकसेवा आणि चांगले काम करायचे आहे, अशी ठाम भूमिका शिवसेना नेते, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Environment Minister Aditya Thackeray ) यांनी मांडली.
आघाडीकडे संख्याबळ :महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ आहेत. शिवसेनेसह आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील, यात शंका नाही. विधान परिषदेत कोणताही घोडेबाजार होणार नाही. महाविकास आघाडीचे राज्यसभेचे मतांची आकडेवारी जुळवाजुळव केली आहे. सर्व उमेदवार निवडून येण्यासाठी एकत्रित रणनिती ठरवली आहे, असे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच सपाचे अबू आझमी मुख्यमंत्र्यांना कामांसाठी भेटले असून त्यांची, नाराजी दूर झाली आहे, असे मंत्री शिंदे यांनी सांगितले.
हेही वाचा -MLC Election : महाविकास आघाडी एकत्र येणे म्हणजे घोडेबाजार नव्हे - विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ