महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

स्थलांतरित पक्षांना बर्ड फ्लूची लागण, चिकन अंडी खाण्यास धोका नाही

हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातील स्थलांतरीत पक्षांमध्येही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात 12,752 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 25,229 कोंबड्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहे.

25,229 कुक्कुट पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट
25,229 कुक्कुट पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट

By

Published : Jan 21, 2021, 1:23 PM IST

मुंबई - हिमाचल प्रदेश, राजस्थान, केरळ, दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा गुजरात व मध्यप्रदेश या राज्यातील स्थलांतरीत पक्षांमध्येही बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळला आहे. तसेच महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी तपासणीचे निष्कर्ष पॉझिटीव्ह आले आहेत. राज्यात 12,752 पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 25,229 पॉल्ट्रीमधील पक्ष्यांना शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाण्यास धोका नाही. अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.

12,752 पक्षांच्या मृत्यूची नोंद
महाराष्ट्रात 19 जानेवारी रोजी कोंबड्यांमध्ये विविध जिल्ह्यात, यवतमाळ 3700, पालघर 106, सातारा 26, सोलापूर 2, नाशिक 7, अहमदनगर 22, बीड 145, नांदेड 95, अमरावती 50, नागपूर 96 व वर्धा 102 अशी 4351 मृतांची नोंद झाली आहे.


बर्ड फ्लू पॉझिटिव्ह
पुर्वी पाठवलेल्या नमुन्यांचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था भोपाळ येथून प्राप्त झाले आहेत. त्यापैकी कोंबड्यांमधील काही नमुने पॉझिटीव्ह आले आहेत.

25,229 कुक्कुट पक्षी नष्ट

त्यामुळे या क्षेत्राला नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत असून, तेथे प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. तसेच या परिसरातील 1091 अंडी आणि 4215 किलो कोंबडी खाद्य देखील नष्ट करण्यात आले आहे. तसेच वरील सर्व ठिकाणी निर्जंतुकीकरणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.


केंद्राचे पथक दाखल
केंद्र शासनाचे पथक डॉ. तपन कुमार साहू क्वारंटाइन ऑफिसर, चेन्नई यांच्या नेतृत्वाखाली, दि. १७.०१.२०२१ पासून राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी राज्यात दाखल झाले आहे. या पथकाने राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली.


येथे संपर्क साधा
या संदर्भात सर्व पोल्ट्री धारक तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणाऱ्या पक्षांमध्ये मरतूक झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मरतूक झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैदयकिय दवाखान्यामध्ये याची माहिती दयावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोलफ्री दुरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती दयावी, मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४(१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणा-या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास, त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरुपात कळवणे बंधनकारक आहे. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झाला आहे, त्याच ठिकाणी रोग प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांनी वरील प्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे.

गैरसमज व अफवा पसरवू नका
पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाण्यास धोका नाही. पॉल्ट्री पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित व काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, अशी विनंती करण्यात सर्व जनतेला सर्व जनतेला करण्यात आली आहे.

हेही वाचा -अवैध बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयाने सोनू सूदची याचिका फेटाळली

ABOUT THE AUTHOR

...view details