मुंबई -भाजप नेते किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांच्या पत्नी डॉ. मेघा सोमय्या ( Dr. Megha Somayya ) यांनी संजय राऊत ( Sanjay Raut ) यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीची याचिकेवर आज सुनावणी झाली. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी कोर्टात आणण्याचे आदेश ईडीला देण्यात यावे. अशी मागणी सोमय्या यांनी शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयात केली. शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा करण्यात आला होता. या याचिकेवर पुढील सुनावणी 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.
संजय राऊतांना न्यायालयासमोर हजर करण्याची मागणी - ईडीच्या अटकेत असल्याने शिवसेना खासदार संजय राऊत ( Shiv Sena MP Sanjay Raut ) मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी शिवडी न्यायालयासमोर हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला ( Directorate of Enforcement ) द्यावेत अशी मागणी मेधा सोमय्या यांच्या वतीने न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
हेही वाचा -Human Flying Drone : माणसाला घेऊन उडणारा 'ड्रोन' विकसित; चाकण परिसरात झाली यशस्वी चाचणी
संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीत -शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोप राऊत यांनी मेघा यांच्यावर केला होता. याच पार्श्वभूमीवर डॉ. मेघा सोमय्या यांनी दाखल केली होती. त्यांनी मानहानीच्या तक्रारीत म्हटले आहे की, संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार, बदनामीकारक आहे. तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी 6 ऑगस्ट रोजी हजर राहा असे आदेश शिवडी न्यायालयाने शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिले होते. मात्र राऊत सध्या ईडीच्या कस्टडीत असल्याने आज न्यायालयासमोर हजर होऊ शकले नाही. संजय राऊत यांना ईडीने ( Sanjay Raut arrested by ED ) पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणात अटक केली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीच्या कस्टडी ( Sanjay Raut ED custody till August 8 ) देण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण -मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम, देखभालीच्या शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यात सोमय्या गुंतल्याचे आरोप करणारे वृत्त 15,16 एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला असे डॉ. मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्ये ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही डॉ. मेधा सोमय्या यांनी केला आहे.
हेही वाचा -देवेंद्रला अमृताची दृष्ट लागली, कशी नशिबाने थट्टा.. किशोरी पेडणेकरांचा अमृता फडणवीसांना गाण्यातून चिमटा