महाराष्ट्र

maharashtra

मुंबई : उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या १२ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

By

Published : Dec 11, 2021, 7:41 PM IST

Published : Dec 11, 2021, 7:41 PM IST

megablock mumbai
मेगाब्लॉक

मुंबई -उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या १२ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुलुंड ते दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर, हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.

हेही वाचा -VIDEO : 'केंद्र सरकारने पुन्हा शेतकरी कायदे लागू केल्यास आंदोलन' - राजेंद्र कोरडे

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या मुलुंड ते दिवा स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत मुलुंड - दिवादरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येईल. परिणामी, कळवा आणि मुंब्रा या स्थानकादरम्यान या गाड्या थांबा घेणार नाहीत.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -

हार्बर मार्गाच्या पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल / बेलापूर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द केल्या आहेत. ट्रान्सहार्बरवरून सुटणारी पनवेल - ठाणे अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द केल्या आहेत. नेरुळ - खारकोपर अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द केल्या आहेत. या शिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी वाहतूक सुरू राहील.

पश्चिम रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी उद्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यानच्या अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. यावेळी काही लोकल रद्द केल्या आहेत.

हेही वाचा -लोकल ट्रेनचा देखभाल-दुरुस्ती नवे दोन कारशेड उभारणार; भूसंपादनासाठी निविदा निघाल्या !

ABOUT THE AUTHOR

...view details