नवी मुंबई - महापे एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली असून ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबईतील महापे एमआयडीसीतील अरवली भूतवली गावाजवळ असणाऱ्या अनधिकृत गोडाऊन जवळ आग लागली आहे. पेट्रोल डिझेलची लाईन तेथून जात असून इंधन गळतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Fire in Mahape MIDC : महापे एमआयडीसीमध्ये भीषण आग; इंधन गळतीमुळे आग लागल्याची शक्यता
नवी मुंबईतील महापे एमआयडीसीतील अरवली भूतवली गावाजवळ असणाऱ्या अनधिकृत गोडाऊन जवळ आग लागली आहे. पेट्रोल डिझेलची लाईन तेथून जात असून इंधन गलतीमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
जीवितहानी नाही - नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून, आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचबरोबर भारत पेट्रोलियमची रेस्क्यू टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. याशिवाय कोपर खैरणे विभाग अधिकारी यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोडाऊन मोठ्या प्रमाणात झाले असून जवळपास असणारी झाडे देखील जळून खाक झाली आहेत. मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.