महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात ठीक ठिकाणी मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

आज मराठी भाषा दिनानिमित्त राज्यात ठीक ठिकाणी कार्यक्रम आणि मोहिमांचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्व आणि तिच्या संवर्धनाची गरज याबाबत पटवून देण्यात आले. कोणी मराठी चित्रपटाच्या तिकिटा वाटून तर कुठे स्वाक्षरी मोहीम राबवून मराठी भाषेवरचे आपले प्रेम व्यक्त करण्यात आले.

New English School Ramanbaug Marathi Language Day
मराठी भाषा दिन

By

Published : Feb 27, 2022, 7:08 PM IST

मुंबई -आज मराठी भाषा दिनानिमित्त राज्यात ठीक ठिकाणी कार्यक्रम आणि मोहिमांचे आयोजन करून मराठी भाषेचे महत्व आणि तिच्या संवर्धनाची गरज याबाबत पटवून देण्यात आले. कोणी मराठी चित्रपटाच्या तिकिटा वाटून तर, कुठे स्वाक्षरी मोहीम राबवून मराठी भाषेवरचे आपले प्रेम व्यक्त करण्यात आले.

हेही वाचा -सरकारने संभाजीराजेंच्या उपोषणाकडे तातडीने लक्ष द्यावे अन्यथा... मराठा समाज समन्वय सदस्यांचा इशारा

मनसेतर्फे पावनखिंड चित्रपटाच्या तिकिटांचे वाटप

मुंबईतील बोरिवली पश्चिम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त पावनखिंड चित्रपट पाहण्यासाठी १०० हून अधिक मराठी शिक्षकांना चित्रपटाची तिकिटे देण्यात आली. मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी स्वतःच्या हाताने शिक्षकांना चित्रपटाची तिकिटे दिली. यावेळी मनसे मुंबई सरचिटणीस नयन कदम, विभागप्रमुख प्रसाद कुलपकर, शाखाप्रमुख महेश नर यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये साहित्यिकांच्या हस्तलिखितांचे प्रदर्शन

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत मराठी भाषा दिन आणि शाळेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून हस्तलिखितांचे प्रदर्शन भरवण्यात आले. ७५ साहित्यिकांच्या हस्तलिखितांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. न.म. जोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

पुण्यात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्ताने राष्ट्रवादीतर्फे मराठी स्वाक्षरी मोहीम

स्वाक्षरी मोहीम

मराठी भाषा गौरव दीन म्हणजेच मराठी राजभाषा दिन. हा दिवस मराठी अस्मिता अभिमानाने मिरवण्याचा, हा दिवस मराठी जगण्याचा, हा दिवस मराठी गाजवण्याचा. पण, आज याच भव्य दिव्य आणि प्राचीन मराठीला केंद्र सरकारकडून अभिजात दर्जा प्राप्त होत नाही. म्हणूनच हडपसर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार चेतन तुपे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कुमार उर्फ गौरव तुपे यांनी स्वाक्षरी मोहीम राबावली.

मराठी भाषा समितीचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व खासदारांना विनंती पत्र लिहिलेली आहेत. मी संसदेत सुद्धा आवाज उठविलेला आहे. मला निश्चितच खात्री आहे, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जातील. आज आमचे सहकारी कुमार तुपे यांनी एक रथ तयार करून त्याच्यावर स्वाक्षरी मोहीम हा अभिनव उपक्रम केला आहे. त्यांच्या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो. निश्चितच या उपक्रमामुळे मराठीचा डंका जगभरात पुन्हा एकदा निनादेल, असा विश्वास व्यक्त करतो असे आमदार चेतन तुपे म्हणाले.

हेही वाचा -Mohit Kambhoj Vs Nawab Malik : नवाब मलिकांची ड्रग्ज टेस्ट करावी; भाजपा नेते मोहित कंबोज यांची मागणी

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details