मुंबई - केंद्र सरकार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) गणेश मूर्ती ऐवजी शाडूच्या मूर्ती तयार करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, आता गणेशोत्सवाला अवघे 100 दिवस बाकी आहेत. तसेच अनेक गणेश मूर्ती कारखानदारांकडून गणपतीच्या मूर्ती तयार देखील झाल्या आहेत. त्यामुळे प्रदूषण मंडळाने निर्णयाचा पूनर्विचार करावा आणि शाडूच्या गणेशमूर्ती बनवण्यासाठी नियमावलीबाबत विचार करावा, अशी मागणी बृहन्मुंबई गणेशोत्सव समनव्य समितीने केली आहे.
बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांची प्रतिक्रिया... हेही वाचा...लॉकडाऊन-४: आत्मनिर्भर भारताकडे जाण्याची पायरी!
केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाचा निर्णय...
केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने देशभरातील उत्सवासाठी लागणाऱ्या मूर्तींची नियमावली जाहीर करताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडूच्या, मातींच्या, नैसर्गिक आणि बायो डिग्रेडेबल साहित्य वापरून मूर्तींची निर्मिती करण्याची सूचना देण्यात आली आहे.
गणेशोत्सव समन्वय समितीची मागणी...
सध्याच्या परिस्थितीत मूर्तिकारांना शाडूची माती लवकर मिळणे देखील कठीण आहे. त्यातच शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी वेळ लागतो. या मूर्ती बनवून झाल्यावर सुकण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे यावर्षी केंद्र सरकारने दिलेल्या नियमावलीबाबत राज्य शासनाने पूर्ण विचार करावा, अशी विनंती बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी केली आहे.