मुंबई -आज राज्यात कोरोनाच्या 324 नव्या रुग्णांची नोंद ( Maharashtra Corona Update ) करण्यात आली. तर, दोघांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज ( शनिवार ) सक्रिय रुग्णांची संख्या 2 हजार 721 झाली असून, पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांवर पोहचला आहे. सलग चौथ्या दिवशी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही, असे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने सांगितले आहे.
शुक्रवारी 318 रुग्ण आढळून आले होते. त्यात सहा रुग्णांची भर पडत आज ( शनिवारी ) 324 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. दिवसभरात 525 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील 98.9 टक्क्यांवर गेले आहे. आजपर्यंत 77 लाख 20 हजार 474 रुग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत.