महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aaditya Thackeray Ayodhya Tour : आदित्य ठाकरेंचं 'जय श्रीराम'; 'या' महिन्यात जाणार अयोध्या दौऱ्यावर

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला ( Aaditya Thackeray Ayodhya Tour ) आहे.

Aaditya Thackeray
Aaditya Thackeray

By

Published : Apr 16, 2022, 6:56 PM IST

मुंबई - राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे अयोध्या दौरा करणार आहेत. खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या दौऱ्याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अयोध्या दौऱ्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून खासदार संजय राऊत यांच्याकडून नियोजन सुरू आहे. मात्र, अद्याप अयोध्या दौऱ्याबाबतची तारीख निश्चित झाली नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पण, मिळालेल्या माहितीनुसार ते मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगितले जात ( Aaditya Thackeray Ayodhya Tour ) आहे.

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, कोल्हापूर 'उत्तर'मधील पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला असून, हा विजय महाविकास आघाडीचा आहे. जनतेने पुन्हा एकदा महाविकास आघाडी वर विश्वास दाखवला आहे. या विजयानंतर कोणालाही पोट दुखी होऊ नये. तसेच, यापुढे आम्ही एक एक राज्य जिंकत जाऊ, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी भाजपाला दिला ( Aaditya Thackeray Kolhapur By Election ) आहे.

रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही - राज ठाकरे यांच्याकडून हिंदुत्वाचा मुद्दा समोर आणून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय. पाच वर्षांनी रंग बदलून हिंदुत्व बदलत नाही. हिंदुत्व आमच्या मनात आणि रक्तात आहे, असा टोला आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला ( Aaditya Thackeray On Raj Thackeray ) आहे.

राणा दाम्पत्याकडे बघत सुद्धा नाही - हनुमान जयंतीच्या निमित्ताने मातोश्रीवर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालीसा वाचावी. नाहीतर मातोश्री मध्ये येऊन आम्ही स्वतः हनुमान चालीसा वाचू, असे आव्हान राणा दाम्पत्याने कडून शिवसेनेला दिले होते. याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारले असता, आपण राणा दाम्पत्याकडे बघत सुद्धा नाही, असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला ( Aaditya Thackeray On Ravi Rana ) आहे.

हेही वाचा -Himalaya Ticket Book : चंद्रकांतदादांना हिमालयात जाण्यासाठी राष्ट्रवादीकडून रेल्वेचे तिकीट बूक; थ्री टायर एसी अन् जेवणाचाही खर्च

ABOUT THE AUTHOR

...view details