महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात सायबर पोलिसांकडून 251 गुन्हे दाखल, 50 जणांना अटक - Maharashtra cyber police register 251 cases,

कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा सोशल मीडियाच्या माध्यमातून घेत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २५१ गुन्हे दाखल केले आहेत.

Maharashtra cyber police register 251 cases
राज्यात सायबर पोलिसांकडून 251 गुन्हे दाखल

By

Published : Apr 21, 2020, 8:47 PM IST

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा व्हॉट्सअ‌ॅप, फेसबुक व टिक-टॉकसारख्या माध्यमांवर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलली असून राज्यात २५१ गुन्हे दाखल केले आहेत.

राज्यात सर्वाधिक गुन्हे बीड जिल्ह्यात २७ असून , पुणे ग्रामीण २०, मुंबई १७, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली ११, नाशिक ग्रामीण १०, नाशिक शहर १०, जालना ९, सातारा ८, नांदेड ८, परभणी ७, ठाणे शहर ६, सिंधुदुर्ग ६, नागपूर शहर ५, नवी मुंबई ५,सोलापूर ग्रामीण ५, लातूर ५, बुलडाणा ५, ठाणे ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, गोंदिया ४, सोलापूर शहर ३, हिंगोली ३, रायगड २, वाशिम १, धुळे १ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

राज्यात आक्षेपार्ह व्हॉट्सअ‌ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी ११२ गुन्हे दाखल झाले आहेत. आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअरप्रकरणी ८७, टिक-टॉक व्हिडिओ शेअर प्रकरणी ५ व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विटप्रकरणी ३, ऑडिओ क्लिप्स व यू-ट्यूब गैरवापर प्रकरणी ४२ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत ५० आरोपींना अटक केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details