पुणे शहरात एप्रिल महिन्याच्या सुरवातीपासून दररोज वाढणाऱ्या कोरोनाच्या आकडेवारीने भीतीच्या दहशती खाली असलेल्या पुणेकरांना गेल्या काही दिवसातील कोरोनाची आकडेवारी काहीसा दिलासा देणारी आहे. गेल्या सहा दिवसांचा विचार केला तर दररोज सापडणाऱ्या नव्या पॉझिटिव्ह रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सरासरी हजाराने ज्यास्त आहे. सोमवारी दिवसभरात २५३८ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली तर ४,३५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
LIVE Updates : राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
21:32 April 26
पुण्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले
19:38 April 26
मुंबईत लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंग फज्जा, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
मुंबई-वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्वसामन्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले आहे. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र,लोकलच्या फेऱ्या कमी केल्यामुळे गर्दीच्या वेळी लोकलमध्ये सोशल सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडतो आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
19:32 April 26
बीड जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 47 हजार 292
बीड -जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 47 हजार 292 एवढे आहेत. यापैकी 40 हजार 857 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज घडीला 6, 435 सक्रिय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असून बीड जिल्ह्यात एकूण साडेतीन हजार जम्बो ऑक्सिजन सिलेंडर लागतात. जिल्ह्यात जवळपास पंधराशे रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
16:32 April 26
सांगलीत विनाकारण फिरणाऱ्यांची अँटीजेन टेस्ट.. प्रशासनाची धडक कारवाई
सांगली -लॉकडाऊनमध्ये विनाकारण बाहेर फिरणार व्यक्तींची अँटीजेन टेस्ट करण्याचा धडाका सध्या सांगली जिल्ह्यात सुरू आहे. सोमवारी मिरज शहरात सकाळपासून अनेक ठिकाणी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या 100 हून अधिक व्यक्तींना पकडून अँटीजेन टेस्ट करण्यात आली. यामध्ये पॉझिटिव्ह येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने गृह विलगीकरण करण्यात येत आहे.
14:42 April 26
बार्शीत ऑक्सिजनअभावी दोन रुग्णांचा मृत्यू, प्रशासनाने आरोप फेटाळले
बार्शी -येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. तर केवळ ऑक्सिजन अभावी नाही तर रुग्णांची स्थिती आणि वाढते वय यामुळे उपचारास ते प्रतिसाद देत नसल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचे प्रशासकीय अधिकारी बन्सीलाल शुक्ला यांनी सांगितले आहे.
14:42 April 26
जळगावात अत्यवस्थ रुग्णसंख्येचा आलेख चढता; ऑक्सिजनची मागणीही वाढली
जळगाव - जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गाचा वेग कायम आहे. दररोज हजारांवर नवे बाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. ऑक्सिजनची वाढती मागणी आणि प्रत्यक्ष होणारा पुरवठा यात तफावत असल्याने भविष्यात आणीबाणीची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. जिल्हाभरात 24 तासात सुमारे 40 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज भासत आहे. मात्र, पुरवठा केवळ 30 ते 35 मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजनचा होत असून, 8 ते 10 टनांचा तुटवडा जाणवत आहे.
10:11 April 26
देशात कोरोनाबाधितांच्या उच्चांकी रुग्णसंख्येची नोंद; साडेतीन लाख रुग्णांसह 2 हजार 812 जणांचा मृत्यू
नवी दिल्ली - देशात गेल्या २४ तासांत 3 लाख 52 हजार 991 नवीन कोरोनाबाधित आढळले असून आतापर्यंतची एका दिवसातील सर्वाधिक 2 हजार 812 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर, रविवारी 2 लाख 19 हजार 272 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नवीन रुग्णांसह देशातील एकूण बाधितांची संख्या 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 झाली आहे. तर बरे झालेल्यांची संख्या 1 कोटी 43 लाख 4 हजार 382 झाली आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 95 हजार 123 रुग्णांनी प्राण गमावले आहे. तसेच सध्या 28 लाख 13 हजार 658 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
09:55 April 26
कोल्हापुरात आतापर्यंत ५३ हजार रुग्ण झालेत कोरोनामुक्त
कोल्हापूर -जिल्ह्यात रविवारी 1 हजार 71 नवीन रुग्ण आढळले असून 31 जणांचा मृत्यू झाला. तर, 256 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून जिल्ह्यात सध्या 7 हजार 358 सक्रिय रुग्ण आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 63 हजार 74 रुग्ण आढळले असून 53 हजार 646 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर, 2 हजार 70 बाधितांचा मृत्यू झाला.
08:47 April 26
जळगावात नव्या रुग्णांपैकी बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
जळगाव - जिल्ह्यात रविवारी1070 रुग्णांची नोंद झाली आहे. तर २० रुग्ण दगावले असून 1097 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 1,16868 रुग्ण बाधित झाले असून त्यापैकी 103891 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या 10899 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 2078 जणांचा मृत्यू झाला आहे.
08:43 April 26
रायगडमध्ये गेल्या वर्षभरात ८५ हजार रुग्णांची कोरोनावर मात
रायगड -जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 563 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, 2 हजार 114 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 85 हजार 256 झाली आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 13 हजार 193 आहे.
08:40 April 26
पुण्यात रविवारी आढळलेल्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
पुणे- जिल्ह्यात दिवसभरात ४६३१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा जास्त म्हणजे ४७५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात रविवारी ७६ बाधितांचा मृत्यू झाला. पुण्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ४००११७ झाली असून सध्या ४९२८९ सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ६४९८ रुग्ण दगावले असून ३४४३३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
08:38 April 26
नागपुरात आतापर्यंत २ लाख ८९ हजार रुग्ण झालेत बरे
नागपूर - शहरात आतापर्यंत 3,74,188 कोरोनाबाधित आढळले आहेत. तर, त्यापैकी 2,89,696 रुग्ण बरे झाले असून 6,936 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
08:34 April 26
मुंबईत पाच लाखांपेक्षा जास्त रुग्ण झालेत बरे
मुंबई -शहरात गेले काही दिवस कोरोनाचे 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. सलग पाच दिवस रुग्णसंख्या 7 हजाराच्या घरात आढळून आली आहे. काल(शनिवार) त्यात घट होऊन 5888 रुग्ण आढळून आले होते. आज (रविवार) 5542 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 64 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 8 हजार 478 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 37 हजार 711 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 75 हजार 740 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 86 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 58 दिवस इतका आहे.
06:59 April 26
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 52 हजार 112 जण कोरोनामुक्त
नाशिक -जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 3 लाख 3 हजार 994 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 2 लाख 52 हजार 112 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत 48 हजार 571 रूग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत कोरोनामुळे 3311 जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.91 टक्के इतके आहे.
06:42 April 26
राज्यातील कोरोना परिस्थितीचे ताजे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..
मुंबई -राज्यात मागील 24 तासांत 66 हजार 19 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 61 हजार 450 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 832 रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 35 लाख 30 हजार 60 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात नव्या 66 हजार 191 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासांत 832 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 1.51 टक्के एवढा आहे. राज्यात एकूण 42 लाख 95 हजार 27 रुग्णांची नोंद झाली. राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 98 हजार 354 इतकी झाली.