मुंबई- राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प सोमवारी विधिमंडळात सादर होणार आहे. तत्पूर्वी अर्थसंकल्पाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सोमवारही सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाबाबत औपचारिक चर्चा या मंत्रिमंडळ बैठकीत होईल. तसेच राज्याच्या इतर महत्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा होण्याची शक्यता या बैठकीत आहे.
कायदा-सुव्यवस्थेचा संदर्भात चर्चा?
राज्यात सध्या कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याचा आरोप विरोधकांडून सरकारवर केला जात आहे. यासोबतच कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या अनेक घटना एकामागोमाग एक समोर येत आहेत. त्यामुळे राज्य सरकारची देखील डोकेदुखी वाढली आहे. आजच्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कायदा-सुव्यवस्थेचा संदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारचा मालक मनसुख हिरेन याचा संशक्यस्पद मृत्य झाला आहे. त्यामुळे हे प्रकरण एनआयकडे देण्यात यावे, अशी मागणी विरोधकांकडून होते आहे. त्यामुळे या प्रकरणावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.