महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महा अर्थसंकल्प २०२१ : जागतिक महिली दिनी राज्य सरकारची शाळकरी मुलींना मोठी भेट

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा ठाकरे सरकारने केली आहे.

महा अर्थसंकल्प २०२१
महा अर्थसंकल्प २०२१

By

Published : Mar 8, 2021, 3:09 PM IST

Updated : Mar 8, 2021, 3:57 PM IST

मुंबई -राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी ठाकरे सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर केला. ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना महाराष्ट्राच्या अर्थकारणात महिलांचा विशेष सहभाग असल्याचे पवार म्हणाले.

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी तरतूद

प्रमुख घोषणा...

  • महिलांच्या नावावर घर असावे, यासाठी राज्य सरकारचा पुढाकार
  • राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
  • महिलेच्या नावाने घराची नोंदणी असल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देण्यात येईल.
  • गावापासून शाळेतपर्यंत जाण्यासाठी मुलींना बसची मोफत सेवा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाने ही योजना असणार
  • यासाठी शाळकरी मुलींच्या प्रवासासाठी 1500 सीएनजी आणि हायब्रीड बस देणार
  • महिलासांठी स्वतंत्र राखीव दलाची घोषणा
  • शहरांमध्ये 'तेजस्विनी' योजनेंतर्गत बसेस वाढवणार.
  • घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना
  • सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेसाठी बीजभांडवल म्हणून २५० कोटी रुपयांची तरतूद. यामध्ये जमा होणाऱ्या रकमेतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना राबवणार.
  • महिला व बालविकास विभागासाठी ३,७६७ रुपयांची राज्य आणि केंद्राची एकत्रित तरतूद.
    शाळकरी मुलींना मोठी भेट
    महिलांसाठी मोठी तरतूद
    शहरांमध्ये 'तेजस्विनी' योजनेंतर्गत बसेस वाढवणार
Last Updated : Mar 8, 2021, 3:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details