महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Breaking News Live : ब्राझीलमधून आणलेले 3.20 किलो ब्लॅक कोकेन मुंबई NCB कडून जप्त

maharashtra breaking
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Sep 29, 2022, 6:30 AM IST

Updated : Sep 29, 2022, 12:32 PM IST

12:31 September 29

ब्राझीलमधून आणलेले 3.20 किलो ब्लॅक कोकेन मुंबई NCB कडून जप्त

मुंबई - NCB ने ब्राझीलमधून येणारे 3.20 किलो उच्च दर्जाचे ब्लॅक कोकेन जप्त केले आणि 3 दिवस चाललेल्या ऑपरेशनमध्ये वाहक आणि रिसीव्हरला वेगवेगळ्या शहरांमध्ये अटक केली: NCB मुंबई

09:48 September 29

हडपसरमध्ये भीषण अपघात; १ ठार तर ३ जण गंभीर

पुणे -पुण्याच्या हडपसरमध्ये एक भीषण अपघात झाला असून या अपघातात 1 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. एका कंटेनरने रिक्षा आणि दुचाकीला उडवले आहे.

09:46 September 29

महिलेचे पतीसोबतचे बेडरूममधील व्हिडिओ वॉचमनने केले शूट; 'असा' घडला प्रकार

नाशिक :नाशिकच्या देवळली कॅम्प भागातील लॅमरोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीच्या ( Lam Road in Dewali Camp Area at ​​Nashik ) वॉचमनने सोसायटीत राहणाऱ्या महिलेचे आणि तिच्या पतीचे मध्यरात्री प्रणय अवस्थेत असताना व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ ( Shocking incident in Nashik ) उडाली आहे. महिलेच्या तक्रारीवरून संशयित वॉचमनला पोलिसांनी ( Watchman has been Arrested by Nashik Police ) ताब्यात घेतले आहे.

09:46 September 29

मुलं चोरणारा समजून कारचालकाला मारहाण; सात किलोमीटर केला पाठलाग

जालना :भोकरदनमध्ये लहान ( Bhokardan, beating car driver ) मुलाच्या अपहरणाची अफवा,( Rumors of child abduction ) लहान मुलांचं अपहरण ( Kidnapping of children ) करणाऱ्या टोळीचा सदस्य समजून कारचालकाला बेदम चोप ( breathless chop to the car driver ) देत नागरीकांकडून कारची तोडफोड करण्यात आली. भोकरदन मधील इब्राहिमपूर फाट्यावर हा प्रकार घडला.

08:08 September 29

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये आठ तासांत दोन बलास्ट, दोन जखमी

उधमपूर (जम्मू-काश्मीर):जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये ( Udhampur Blasts ) आठ तासांत दोन स्फोट ( Two Blasts In Udhampur ) झाल्याची माहिती समोर आली आहे. पहिला स्फोट बुधवारी रात्री उधमपूरमधील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या रिकाम्या बसमध्ये झाला. या स्फोटात दोन जण जखमी ( 2 injured in explosion in parked bus in Udhampur ) झाले आहेत. तर दुसऱ्या स्फोटाबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. पहिली घटना उधमपूर जिल्ह्यातील डोमेल चौकातील पेट्रोल पंपाजवळ रात्री 10.30 च्या सुमारास घडली. या स्फोटात जवळपास उभ्या असलेल्या इतर वाहनांचेही नुकसान झाले आहे. जखमींना उधमपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. तपास सुरू आहे.

08:07 September 29

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते 'आता भाजपसोबत राहायचे नाही'; अशोक चव्हाणांचा गौप्यस्फोट

नांदेड : महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेची कोंडी होत ( Ashok Chavan Created a Stir in Political Circles ) आहे. शिवसेनेला निधी मिळत नाही, असा आरोप करीत शिंदे गटाने बंड केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi Government Collapsed ) कोसळले. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कोंडी होण्याची शक्याता ( Ashok Chavan Statement Possibile of Dilemma For CM ) आहे.

07:09 September 29

सणांच्या निमित्ताने वांद्रे ते जम्मू, दिल्ली, पटनापर्यंत विशेष ट्रेन

मुंबई - दसरा, दिवाळी आणि त्या पाठोपाठ येणारे भारतातील इतर राज्यातील सण पाहता रेल्वे प्रवासासाठी लोकांची गर्दी होत आहे. लोकांच्या मागणीला प्रतिसाद म्हणून पश्चिम रेल्वेने बांद्रा टर्मिनस ते जम्मू, तवी मुंबई सेंट्रल ते बनारस, ओखा ते दिल्ली आणि अहमदाबाद ते पटना अशा विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

07:08 September 29

शिवतीर्थावर येणार दीड लाख शिवसैनिक; शिवसेनेच्या तयारीला वेग

मुंबई - शिवतीर्थावर शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर शिवाजी पार्कवर जय्यत तयारी सुरू झाली आहे. राज्यातून सुमारे दीड लाख शिवसैनिक आणण्याचे नियोजन करावे, अशा सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

07:08 September 29

अयोध्या पौळ पाटील धमकी प्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांवर भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई :युवा सेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ-पाटील यांना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांनी फोन करून धमकावणे, अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर या प्रकरणात मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात अयोध्या यांनी काल सायंकाळी ७.३० वाजल्यापासून तक्रार अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास भायखळा पोलिसांनी २ ज्ञात आणि ३ अज्ञात व्यक्तींविरोधात भादंवि कलम २९४, ५०६, ५०९, ५०४ आणि ५०० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

06:24 September 29

सदावर्तेंची तुलना अर्धवटरावांशी, शिवसेनेकडून पाणउतारा

मुंबई - जगामध्ये दोन संघ आहेत, बौद्ध भिक्खू संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. राष्ट्रवादी स्वयंसेवक काम देशहिताचे आहे, बौद्ध भिक्खू संघाला हेच विचार टार्गेट करतील, असे वादग्रस्त विधान ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी केले होते. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुणरत्न सदावर्ते म्हणजे अर्धवटराव असल्याची टीका केली. तसेच सदावर्ते पूर्णवेळ राजकारणी आहेत की वकील हे पहिलं ठरवावं, राष्ट्रीय सेवक संघाचे कार्यकर्ते असल्याच्या थाटात वावरू नये, अशा शब्दांत पाणउतारा केला.

06:24 September 29

वसईच्या कॉस पॉवर कंपनीतील दुर्घटना खेदजनक

वसई - वसई पूर्वेच्या जुचंद्र वाकीपाडा येथील कॉस पॉवर कंपनीत बुधवारी दुपारी नायट्रॉजन सिलेंडरचा भीषण ब्लास्ट झाल्याने या घटनेत 3 कामगार जागीच ठार झाले होते, तर ७ ते 8 जण जखमी असून त्यांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेत संदीप कुमार संतोष मिश्रा, अजय दत्ताराम बदर, अश्विन भाई रसिक भाई पटेल यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अंधारात बॅटरीच्या उजेडात भेट दिली. यावेळी त्यांनी दुःख व्यक्त करून अशा घटना भविष्यात पुन्हा घडणार नाही याची बारकाईने काळजी घेणार असल्याचे ते म्हणालेत.. आहेत.

06:08 September 29

MAHARASHTRA BREAKING NEWS

मुंबई - ठाण्यातील नवरात्रौत्सव मंडळांना दानवे यांनी भेट देत देवींचे दर्शन घेतले. यावेळी शिवसैनिकांमध्ये मोठया प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. सर्वांनी फटाक्यांच्या जल्लोषात दानवे यांचे स्वागत केलं. ठाणे येथील टेंभी नाक्यावरील आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवातील देवीला साकडे घालताना चाळीस महिषासुरांचे मर्दन कर, असे दानवे म्हणाले

Last Updated : Sep 29, 2022, 12:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details