महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Breaking News एक महिन्यापूर्वी सगळ्यात मोठी हंडी आम्ही फोडली, मुख्यमंत्री शिंदे

Maharashtra Breaking New
महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज

By

Published : Aug 19, 2022, 6:39 AM IST

Updated : Aug 19, 2022, 5:46 PM IST

17:44 August 19

मुख्यमंत्री दहीहंडीसाठी ठाण्यात

मुख्यमंत्री दहीहंडीसाठी ठाण्यात

धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न होतं की एकदा ठाण्यातला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, आनंद दिघे यांनी मला हे बोलून दाखवलं होतं

गणपती उत्सव देखील मोठ्या जल्लोषात साजरे होणार

एक महिन्यापूर्वी सगळ्यात मोठी हंडी आम्ही फोडली

50 थर लावले आम्ही

मुंबई सुरत वाया गुवाहाटी

16:28 August 19

मुख्यमंत्री शिंदेंनी लावली घाटकोपरमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात हजेरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जन्माष्टमीनिमित्त घाटकोपरमध्ये दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी झाले.

12:52 August 19

मुंबई दहीहंडीत १२ गोविंदा जखमी

मुंबई दहीहंडी २०२२ दरम्यान थर तयार करताना १२ गोविंदा पथक जखमी झाले आहेत. त्यापैकी 5 जणांवर उपचार झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 7 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

12:51 August 19

संशयास्पद बोटीतील साहित्य काढले

रायगड किनाऱ्यावर काल जप्त केलेल्या तीन एके ४७ रायफलसह संशयास्पद बोटीतील साहित्य काढताना सुरक्षा कर्मचाऱ्याने काढले आहे.

11:31 August 19

इटालियन गिर्यारोहकाला वाचविण्याकरिता भारतीय वायुसेनेची मोहिम सुरू

कारगिल सेक्टरमध्ये डोंगराच्या माथ्यावर अडकलेल्या इटालियन गिर्यारोहकाला वाचवण्यासाठी भारतीय वायुसेनेने आपले चीतल हेलिकॉप्टर तैनात केले आहे. ऑपरेशन्स प्रगतीपथावर आहेत.

11:30 August 19

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया अमेरिकेचे होणार रहिवासी

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोटाबाया यांनी यूएस ग्रीन कार्डसाठी अर्ज केला.

10:19 August 19

वाहन अपघातात प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृत्यू

खिउरी, मंडी येथे वाहन अनियंत्रित झाल्याने ६० फूट खाली रस्त्यावर पडल्याने एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृत्यू झाला, तर ४ जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरला IMC मध्ये रेफर करण्यात आले. इतर जखमींवर नेर चौक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.

10:04 August 19

आप, केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला, अनुराग ठाकूर

अरविंद केजरीवाल यांनी लोकांना मूर्ख समजणे थांबवावे. देशातील जनतेला संबोधित करणे थांबवावे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सत्येंद्र जैन तुरुंगात गेल्यावर त्यांना निलंबितही केले नाही. आप, केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांचा खरा चेहरा आज जनतेसमोर आला आहे, असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटले आहे.

08:56 August 19

भिवंडीत बनावट GST इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई झोनमधील CGST भिवंडी आयुक्तालयाने बनावट GST इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला, जे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवत होते. अशाच एका फर्मने 14.30 कोटी रुपयांच्या बोगस इनव्हॉइसवर 2.57 कोटी रुपयांचे अपात्र ITC मिळवले आहे. फर्मच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई झोनमधील सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने बनावट जीएसटी इनव्हॉइस रॅकेटचा पर्दाफाश केला. ज्याचा वापर सुमारे 18 कोटी रुपयांचे बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट मिळवण्यासाठी आणि 41 कोटी रुपयांच्या बोगस इनव्हॉइसवर पास करण्यासाठी केला जात होता. सीजीएसटी कायद्यांतर्गत याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, असे सुमित कुमार आयुक्त यांनी सांगितले.

08:56 August 19

अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी तीन जणांना अटक

पालघर जिल्ह्यातील विरार परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. ४ जणांवर गुन्हा दाखल झाल्याचे विरार पोलिसांनी सांगितले.

08:48 August 19

मनिष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयचे अधिकारी, सिसोदिया यांनी केले ट्विट

सीबीआय घरी आली आहे. आम्ही प्रामाणिक आहोत, लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. दुर्दैवाने या देशात जो कोणी चांगले काम करतो त्यांना त्रास दिला जात आहे. त्यामुळेच आपला देश अजूनही नंबर-1 नाही, असे ट्विट दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केले.

08:45 August 19

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार, राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना

जखमी गोविंदांवर शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषदेचे दवाखाने यांना नि:शुल्क वैद्यकिय उपचार करण्याच्या सूचना देण्याच्या केल्या सूचना

08:22 August 19

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती आणि आनंदाचा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, असे पंतप्रधान मोदींनी ट्विट केले.

07:13 August 19

पेट्रोल व डिझेलचे दर होणार कमी, कारण

सरकारने क्रूडवरील उपकर कमी केला जो 17,750 रुपये प्रति टन वरून 13,000 रुपये प्रति टन झाला. डिझेलवरील निर्यात शुल्क 5 रुपये प्रति लीटरवरून 7 रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे. एव्हिएशन टर्बाइन इंधनावरील (एटीएफ) निर्यात शुल्क 2 रुपये प्रति लिटरवर वाढविल्याचे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

07:12 August 19

सोन्या चांदीचा २५ लाखांचा झूला

जन्माष्टमीच्या मुहूर्तावर वडोदरा येथील एका मंदिरात भाविकांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीसाठी सोन्या चांदीचा २५ लाखांचा झूला तयार केला आहे.200 ग्रॅम सोने आणि 7 किलो चांदीपासून बनवलेला झूला, त्याची किंमत 24-25 लाख रुपये आहे जी भाविकांनी दान केली, असे मंदिराच्या अधिकाऱ्याने सांगितले

07:12 August 19

गेंड्याच्या शिंगांचा अवैध व्यापार करणाऱ्या ३ जणांना अटक

गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा उद्यानाच्या परिसरात गेंड्याच्या शिंगांचा अवैध व्यापार करणाऱ्या ३ जणांना वन अधिकाऱ्यांनी पकडले. एका आरोपीला काझीरंगाजवळील बागमारी परिसरातून पकडण्यात आले, त्याच्या कबुलीनंतर आणखी दोघांनाही पकडण्यात आले.

06:18 August 19

Maharashtra Breaking News मुंबई दहीहंडीत १२ गोविंदा जखमी

मुंबई शिंदे फडणवीस सरकारने दहीहंडीला खेळाचा दर्जा देिल्याने Sports status to Dahi handi यंदा सणाचे स्वरुप बदलणार आहे. दहीहंडीचा समावेश खेळांमध्ये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी CM Eknath Shinde केली आहे. याबाबतचा सरकारी आदेश देखील शिंदे-फडणवीस सरकारने काढला आहे. प्रो कब्बडीप्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत.

हे ब्रेकिंग पेज दिवसभरात अपडेट होणार आहे. देश, विदेश व महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचण्यासाठी या बातमीवर क्लिक करत रहा आणि राहा अपडेट

Last Updated : Aug 19, 2022, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details