इंटरनेट सर्वर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका
राज्य सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांची माहिती
14:31 August 12
सीईटी परीक्षेमध्ये 103 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा होणार
इंटरनेट सर्वर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका
राज्य सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांची माहिती
14:11 August 12
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारभार टिकणार नाही- नाना पटोले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारभार टिकणार नाही. ते घटनाबाह्य आहे. 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. ते पैशाच्या जोरावर, ब्लॅकमेलिंग आणि अशाच प्रकारे सत्तेत आले आहेत, अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी केली आहे.
13:11 August 12
29 गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक
आसामच्या नागाव जिल्ह्यातील समुगुरी भागातील दोघांना रुपाही ते बिरनिहाट येथे 29 गुरांची तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक केली.
12:35 August 12
अमरावतीत हर घर तिरंगा वाहनाची तोडफोड
अमरावतीत हर घर तिरंगा वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे.
11:10 August 12
151 पोलीस कर्मचार्यांना उत्कृष्टतेसाठी पदके जाहीर
151 पोलीस कर्मचार्यांना 2022 सालासाठी तपासातील उत्कृष्टतेसाठी केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर करण्यात आले आहेत.
10:19 August 12
खंडाळ्यात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, सर्वच रेल्वे गाड्या उशिराने धावणार
पिंपरी-चिंचवड-मध्यरात्री खंडाळा घाटातील मंकीहील ते ठाकुरवाडी दरम्यान दरड कोसळली. दरड काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरड अप लाईनवर कोसळल्याने याचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला नाही, कारण, मिडल लाईनवर रेल्वे गाड्या वळवण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे रेल्वे पोलिसांनी दिली आहे. सर्व रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत.
10:16 August 12
माजी मंत्री केपीपी बास्कर यांच्याशी संबंधित २६ जागांवर दक्षता संस्थेचे छापे
तामिळनाडूचे माजी मंत्री केपीपी बास्कर यांच्याशी संबंधित २६ जागांवर दक्षता संस्थेने छापे टाकले
10:16 August 12
अमरनाथ पवित्र गुहेत आरती
श्रावण पौर्णिमेनिमित्त अमरनाथ पवित्र गुहेत आरती केली जात आहे.
09:33 August 12
प्रसिद्ध गायक शिवमोगा सुबन्ना यांचे बंगळुरू येथे निधन
राष्ट्रीय पुरस्कार विजेते पार्श्वगायक शिवमोगा सुबन्ना यांचे कर्नाटकातील श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हस्कुलर सायन्सेस अँड रिसर्च, बंगळुरू येथे निधन झाले.
09:15 August 12
कोल्हापुरात पहाटे भुस्खलन
करंजफेन ता. शाहूवाडी येथील धावडा येथील खिंड येथे पहाटे भुस्खलन झाले
कोणतीही जीवित हानी काही
कोल्हापूरात पूरस्थितीची अध्याप भिती
राधानगरी धरणाचे 5 दरवाजे अध्याप उघडलेलेच
08:38 August 12
माहीम कॉजवे खाडीत दोघे बुडाले, एकाचा मृतदेह सापडला
मुंबई - माहीम कॉजवे खाडीत मध्यरात्री दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यूदेह सापडला. पोलीस आणि मुंबई अग्निशमन दलाकडून दुसऱ्याचे शोधकार्य सुरू आहे.
08:11 August 12
आणंद येथील अपघात प्रकरणी काँग्रेस आमदाराच्या जावयाला अटक
आणंद येथे सायंकाळी सातच्या सुमारास कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ऑटोमधील चार आणि दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून कार चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. . या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. आयपीसी कलम 304 लागू करण्यात आली आहे. सहा मृतांची माहिती मिळाली आहे. आरोपी केतन पढियार हा काँग्रेस आमदाराचा जावई आहे, असे एएसपी अभिषेक गुप्ता यांनी सांगितले.
08:09 August 12
तुंगभद्रा धरणातून विसर्ग केल्यानंतर कांपली-गंगावती पूल पाण्याखाली गेला
कोप्पल येथील तुंगभद्रा धरणातून पाणी सोडण्यात आल्यानंतर कांपली-गंगावती पूल पाण्याखाली गेला. कोटे अंजनेय मंदिर आणि आजूबाजूची ठिकाणेही पाण्याखाली गेली आहेत.
08:09 August 12
बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत १७ लोक अद्याप बेपत्ता
बांदा, उत्तर प्रदेशमध्ये एनडीआरएफ, एसडीआरएफची टीम कार्यरत आहे. पाऊस पडल्याने तो निसरडा झाला आहे. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत. रात्रीच्या वेळी बचाव कार्य केले जात नाही. बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत 3 मृतदेह अद्याप सापडले नाहीत. 17 लोक अद्याप बेपत्ता आहेत असल्याचे डीआयजी व्हीके मिश्रा यांनी सांगितले.
07:38 August 12
दहशतवाद्यांचे पुन्हा परप्रांतीय लक्ष्य, गोळीबारात एक मजूर ठार
रात्री दहशतवाद्यांनी सोडनारा सुंबल, बांदीपोरा येथे मोहम्मद अमरेज, मधेपुरा, बेसरह, बिहार येथील एका स्थलांतरित मजुरावर गोळीबार करून जखमी केले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असता त्याचा मृत्यू झाल्याचे काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले.
07:26 August 12
Maharashtra Breaking News सीईटी परीक्षेमध्ये 103 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा होणार
मुंबई-येत्या १५ ऑगस्टला ( 15th August Independence Day ) देशाचा अमृतमहोत्सवी वर्षे साजरा केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे ( Chief Minister Shinde ) यांनी प्रत्येक जिल्ह्यातील ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री, जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली आहे. यासंदर्भातील यादी राज्य सरकारने जाहीर केली आहे. यंदा देशाचा अमृत महोत्सवी वर्ष ( Azadi Ka Amrit Mahotsav ) साजरा केला जातो आहे. देशासह राज्यात हर घर तिरंगा हा ( Har Ghar Tricolor Campaign ) उपक्रम हाती घेण्यात आला आहे.