महाराष्ट्र

maharashtra

Assembly Session Live Updates : आ्म्ही कालही शिवसैनिक होते, आजही आहोत, उद्याही असणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jul 4, 2022, 6:41 AM IST

Published : Jul 4, 2022, 6:41 AM IST

Updated : Jul 4, 2022, 3:40 PM IST

Floor test of Shinde Fadnavis government
शिंदे फडणवीस सरकारची दुसरी कसोटी

15:38 July 04

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेतील भाषण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेतील भाषण

भास्करराव आम्ही गद्दार नाही

मला सुरुवातीला मुख्यमंत्री करणार होते हे खरे आहे

भाजप शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद देणार होते

काँग्रेसबरोबर असल्याने सावरकरांवर बोलता येत नव्हते

आ्म्ही कालही शिवसैनिक होते, आजही आहोत, उद्याही असणार

बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड केली जाणार नाही

14:08 July 04

आम्ही बंड केले नाही, उठाव केला- गुलाबराव पाटील

एक जरी सदस्य फुटला तरी आपण चौकशी करतो. बाळासाहेबांच्या मुलाला दु:ख द्यायचे नाही. सगळे आमदार दु:ख सांगायचो आहे. नजर देण्याची हिंमत नाही, असे आम्हाला म्हटले जाते. आम्ही तडीपारी भोगली आहे, असे शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

13:53 July 04

लोकशाहीची पायमल्ली केली- सुनील प्रभू

दबावतंत्र वापरून लोकशाहीची हत्या झाली आहे. सर्व गोष्टी दबावतंत्र वापरून झाल्याची टीका शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी माध्यमांशी बोलताना केली.

13:46 July 04

व्हीपचे उल्लंघन झाले आहे, त्यावर कारवाई करणार- आदित्य ठाकरे

व्हीपचे उल्लंघन झाले आहे. त्यावर कारवाई करणार असल्याचे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी विधानसभेच्या बाहेर माध्यमांशी बोलताना सांगितले. मतदारांना भेटणार तेव्हा काय उत्तर देणार, असा त्यांनी प्रश्न बंडखोर आमदारांना विचारला.

13:28 July 04

एक दिवसही हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत-सुधीर मुनगंटीवार

भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका केल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिले. एक दिवसही हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. तुमच्यासाठी रामायण हे काल्पनिक कथा आहे, असेही त्यांनी म्हटले.

13:11 July 04

केवळ सरकार पाडण्यासाठी प्रयत्न, भास्कर जाधव यांची भाजपवर टीका

तुम्ही कधी नुपूर शर्मा, तर कधी हनुमान चालिसा तर कधी सुशातसिंह राजपूत आणला..केवळ सत्ता उलथविण्यासाठी प्रयत्न केले अशी टीका भास्कर जाधव यांनी भाजपवर टीका केली. गेली ८ दिवस मी अस्वस्थ लोकशाहीत दुसरा आवाज ऐकायचा असतो. एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुखांचे नाव घेतात. त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. ज्यांच्या मागे ईडी सुरक्षा, त्यांना आता केंद्राची सुरक्षा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

13:00 July 04

सत्तेचा आनंद ठीक आहे, पण जबाबदारी असते-बाळासाहेब थोरात

अनेक भागात पेरण्या झाले आहेत. गुलाबराव पाटील तुम्ही आता तिकडे बसले आहात. आता दुबार पेरणीची वेळ आली आहे. आता, तुमचे सर्वसामान्यांकडे दुर्लक्ष झाले. एक महिना मान्सून झाला नसल्याने धरणात पाणी नाही. सत्तेचा आनंद ठीक आहे, पण जबाबदारी असते, हे लक्षात ठेवा, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.

12:54 July 04

शिस्त लावण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची-बाळासाहेब थोरात

बाळासाहेब थोरात यांच्या भाषणात अडथळे आले. यावेळी शिस्त लावण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांची असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. सरकार झाल्यानंतर मंत्रिमंडळात सात मंत्री होते. शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना लागू केली. ही योजना चालू ठेवावी, अशी अपेक्षा आहे.

12:48 July 04

कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्याचा प्रयत्न- अजित पवार

एकनाथ शिंदे यांच्या खात्याला भरघोस निधी दिला. शिवभोजन थाळी केंद्रदेखील शिफारसीने दिले. एकनाथ शिंदे व उदय सामंत याना 261 कोटी निधी दिला. सर्वांना मतदार संघात निधी दिला. कारण नसताना राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम केल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

12:43 July 04

एकनाथ शिंदे यांना केवळ रस्ते विकास महामंडळ खातेच का दिले, अजित पवार यांचा उपमुख्यमंत्र्यांना सवाल

देवेंद्र फडणवीसांचं भाषण मी बारकाईने ऐकलं. तुम्ही एकनाथ शिंदेंचं इतकं समर्थन करत होता. मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रीमंडळात होते, तेव्हा फक्त रस्ते विकास महामंडळ खातंच का दिले, असा खोचक प्रश्न राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांना उपस्थित केला.

12:35 July 04

१०६ आमदार असताना ४० आमदारांचा मुख्यमंत्री, नक्की काहीतरं काळेबरं..अजित पवार

१०६ आमदार असताना ४० आमदारांचा मुख्यमंत्री करण्यात येत आहे. यात नक्की काही तरी काळेबरं आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी लगावला. शिवसेनेचे कार्यकर्ते बंडखोर नेत्यांसोबत येत नसल्याचा इतिहास असल्याचेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

12:21 July 04

देवेंद्र फडणवीस बोलताना त्यांच्यात पूर्वीसारखा जोश नव्हता, अजित पवारांचा टोला

फडणवीस बोलताना त्यांच्यात पूर्वीसारखा जोश नव्हता, असा टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला. यावेळेस विधिमंडळात जे आमदार निवडून आले त्यात देवेंद्र फडणवीस सर्वात भाग्यवान आहेत. ते अडिच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते, आणि उपमुख्यमंत्री झालेत,

12:18 July 04

शेवटच्या कॅबिनेटच्या बैठकीत जे निर्णय झालेत ते पुन्हा लागू करू. एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो. विरोधी पक्षाने सहकार्य करावे, असे फडणवीस म्हणाले.

12:16 July 04

सरकार आकसाने काम करणार नाही. चांगले निर्णय पुढे नेऊ. संपूर्ण वाटचालीत एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला. लोकांना आपला नेता आपल्यासोबत असावा असे त्यांना वाटायचे. आताचा नेता लोकांनसोबत असेल, मुंबईकडेच नाही तर महाराष्ट्राकडेही बघेल, असे फडणवीस म्हणाले.

12:09 July 04

सत्ता निरंकूश होते, तेव्हा चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, फडवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

शिंदे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार, त्यांची कारकीर्द यशस्वी करणार. त्यांच्यात आणि माझ्यात कुरघोडीचे राजकारण दिसणार नाही. आमच्यातली कधीच मोडली नाही. एवढेच सांगतो, जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकूश होते, तेव्हा कुठल्यातरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो, असे फडणवीस म्हणाले.

11:58 July 04

एकनाथ शिंदे 24 तास काम करणारे व्यक्ती, त्यांच्यात प्रचंड माणूसकी - देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे 24 तास काम करणारे व्यक्ती, त्यांच्यात प्रचंड माणूसकी. सरकार हे संवेदनशील असले पाहिजे. आंदोलक आक्रमक झाले की कारवाई करावी लागते. मात्र काही पोस्ट केली, थोडे काही बोलले की त्यावर कारवाई होत होती. हे बरोबर नाही. कमी बोलायचं काम अधिक करायचं, त्यांच्यातील धीर, यामुळे आज त्यांची जडणघडण जी आहे ती झाली. त्यांनी महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकेल्यांना बाहेर काढले. वयक्तिक आयुष्यात त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. पण ते त्यातून बाहेर पडले. मी पुन्हा आलो आणि शिंदे यांना बरोबर घेऊन आलो, असे फडणवीस म्हाणाले.

11:52 July 04

समृद्धी महामार्गेच सातत्याने होईल यासाठी शिंदेंनी प्रयत्न केले - देवेंद्र फडणवीस

सीमा प्रश्नावर शिंदे यांन कारावास भोगला. त्यांच्यावर बाळासाहेब, दिघे यांच्या विचारांचा प्रभाव. शिंदे यांनी विविध पदे भूषवीली. समृद्धी महामार्गाची संकल्पना मी मांडली, एमएसआरडीच्या माध्यमातून काम करण्याचे ठरले, रस्त्याचा एक टप्पा पूर्णत्वास आला. मात्र ज्या व्यक्तीने ग्राउंडवरील समस्या सोडवल्या, यांनी ते काम सातत्याने होईल यासाठी प्रयत्न केले ती व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे, असे फडणवसी म्हणाले.

11:48 July 04

अदृश्य हातांनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार - देवेंद्र फडणवीस

अदृश्य हातांनी आम्हाला मदत केली त्यांचे आभार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.

11:44 July 04

समाजवादी पार्टीचे रईस शेख, अबू आझमी बहुमत चाचणीत तटस्थ

समाजवादी पार्टीचे रईस शेख, अबू आझमी, तर एमआयएमचे शाह फारुख अन्वर ही तीन मते तटस्थ.

11:44 July 04

महाविकास आघाडीच्या वतीने 99 जणांनी केले मतदान.

11:39 July 04

विश्वासदर्शक ठरावात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 164 मते

विधानसभेत विश्वासदर्शक ठरावात एकनाथ शिंदे यांच्या बाजूने 164 मते पडली. आता विश्वासदर्शक ठरावाच्या विरोधात आलेली मते विरोधी बाकांवरून मोजली जातील.

11:36 July 04

'हे' आमदार मतदानाला मुकले

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार हे सभागृहाबाहेर दिसले. झिशान सिद्दिकी, संग्राम जगतापही, धिरज देशमुख हे सुद्धा सभागृहाबाहेर दिसून आले.

11:32 July 04

शिंदे भाजप सरकारने बहुमत जिंकले. 164 मतं मिळवलीत.

11:29 July 04

संतोष बांगर यांनी विश्वासदर्शक ठरावाला पाठिंबा दिला. त्यावेळी विरोधी बाकांवरील आमदारांनी घोषणाबाजी.

11:26 July 04

शिंदे-भाजप सरकारने बहुमत जिंकले.

11:26 July 04

प्रताप सरनाईक यांनी मतदान करताच विरोधकांनी ईडी म्हणून दिल्या घोषणा.

11:23 July 04

अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार मतदानाला मुकले.

11:21 July 04

बहुमत चाचणीत भाजपचा आकडा शंभरीपार.

11:18 July 04

आमदार संतोष बांगर यांचे शिंदे गटाला मतदान

बंडखोर आमदार संतोष बांगर यांचे शिंदे गटाला मतदान.

11:13 July 04

आज विधानभवनात बहुमत चाचणी सुरू, आधी शिंदे भाजप गटाचे मतदान

आज विधानभवनात बहुमत चाचणी सुरू. आधी शिंदे भाजप गटाचे मतदान.

11:10 July 04

आज विधानभवनात बहुमत चाचणी, शीरगणती प्रक्रियेने होणार मतदान

आज विधानभवनात बहुमत चाचणी. शीरगणती प्रक्रियेने होणार मतदान.

10:37 July 04

एकनाथ शिंदे गटात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर...

कळमनुरीचे आमदार संतोष बांगर सुद्धा एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. ते काल उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसले.

10:14 July 04

164 पेक्षा जास्त आमदार आमच्या बाजूने मतदार करतील- प्रवीण दरेकर

काल आमची अग्नी परीक्षा होती ती आम्ही पास केली. आज विश्वास दर्शक ठरावाला सुद्धा आम्ही बहुमताने तो पारित करू. काल १६४ आमदार आमच्या बाजूने होते. त्यापेक्षा जास्त आमदार आज आमच्या बाजूने मतदान करतील. ज्या अवैध पद्धतीने अजय चौधरी व सुनील प्रभू यांची गटनेते व प्रतोद म्हणून नियुक्त केली गेली होती. ती कायद्याने रद्द करण्यात आल्याचे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगितले.

09:38 July 04

सचिवालयाचा निर्णय आम्हाला मान्य नाही - अजय चौधरी

विधिमंडळ सचिवांच्या या निर्णयानंतर बोलताना उद्धव ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी यांनी सांगितले आहे की, विधिमंडळ सचिवालयाला गटनेते पद रद्द करण्याचा अधिकार नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात याबाबत कायदेशीर लढाई लढणारअशी प्रतिक्रिया शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी दिली आहे.

09:13 July 04

बाहेरचे सोमेगामे आणून...शिवसेनेची शिंदे फडणवीस सरकारवर टीका

घटनेचे रखवालदार म्हणवून घेणारेच दुटप्पीपणे वागत असतील तर अपात्र विधानसभा सदस्यच काय, बाहेरचे सोमेगामे आत आणून विधीमंडळात कोणतेही ठराव व निवडणूक हे लोक जिंकू शकतात. महाराष्ट्रात असे वर्तन व राजकारण कधी घडले नाही, अशी टीका शिवसेनेने सामनामधून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

09:01 July 04

विधानसभेत आज ११ वाजता विश्वासरदर्शक ठराव मांडण्यात येणार

विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे फडणवीस सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. आज ११ वाजता विश्वासरदर्शक ठराव मांडण्यात येणार आहे.

07:35 July 04

निवडणुकीवेळी पक्षाने 1.5 कोटी दिले, तरीही बालाजी कल्याणकर गद्दार झाले...

विधानसभेचे विशेष अधिवेशनापूर्वीच सत्तेसाठी घोडेबाजार झाल्याचा आरोप होत आहे. पक्षाने निवडणुकीसाठी आमदार बालाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केला आहे. तरीही बालाजी कल्याणकर गद्दार झाल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी म्हटले आहे.

06:23 July 04

floor test in Maharashtra assembly : आम्ही बंड केले नाही, उठाव केला- गुलाबराव पाटील

मुंबई- विधानसभेच्या पहिल्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकारने शिवसेनेवर मात केली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिंदे-फडणवीस सरकार हे बहुमताला सामोरे जाणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेने आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले. आणि बाहेर पडून मुख्यमंत्री पद मिळवले. त्यावर आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात भाष्य केले. एकनाथ शिंदे यांनी जर मुख्यमंत्रीपद त्यांना हवे होते हे आधीच सांगितले असते तर, त्यांना नक्कीच मुख्यमंत्री केले असते. असे सांगत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

राहुल नार्वेकर यांना अभिनंदन -विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे विजयी उमेदवार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar new assembly speaker) यांचे अभिनंदन केले. राहुल नार्वेकर यांचा अभिनंदन ठराव मांडाताना नार्वेकर यांच्या राजकीय कारकीर्दीचा आढावा त्यांनी घेतला. त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी मांडत त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना त्यांनी चौफेर टोलेबाजी करत सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली.Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार

हेही वाचा-Ajit Pawar To CM Eknath Shinde: सांगितले असते तर आधीच मुख्यमंत्री केले असते - अजित पवार

शिवसेनेचे बंडखोर नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) व भाजपसाठी ३ जुलैला विधानसभेत विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा पहिला पेपर होता. तो पेपर त्यांनी विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये व्यवस्थितपणे पार पडला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे उमेदवार राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) हे आज विराजमान झाले आहेत. परंतु, आता दुसरी महत्त्वाची लढाई उद्या ( 4 जुलै ) बाकी असून, विश्वास दर्शक ठरावाला शिंदे-फडणवीस सरकारला सामोरे जायचं आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

'आम्ही बहुमताने विश्वासदर्शक ठराव जिंकू' - देवेंद्र फडणवीस म्हणाले की, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत १६४ आमदार आमच्या बाजूने होते. आमचे लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक हे दोन आमदार आजारी असल्याकारणाने ते आज अनुपस्थित राहिले. आमच्याकडे १६६ आमदारांचा पूर्ण पाठिंबा आहे. उद्या विश्वास मताचा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा प्रस्ताव आम्ही बहुमताने पारित करू, असा विश्वास उपमुख्यत्र्यांनी व्यक्त केला ( Devendra Fadnavis On Vidhan Sabha Floor Test ) आहे.

Devendra Fadnavis : विधानसभा अध्यक्षपदाचा पेपर सोप्पा, बहुमत चाचणीचं काय?; देवेंद्र फडणवीस म्हणाले...

राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 जुलैला झाली. या निवडणुकीत भाजप व शिवसेना बंडखोरांचे उमेदवार राहुल नार्वेकर निवडून ( Rahul Narwekar Assembly Speaker ) आले. त्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी अभिनंदानाचे भाषण केले. यावेळी राज्यपालांना विरोधी पक्षाकडून चांगलेच टोले लगावण्यात आलं. महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नावे पाठवण्यात आली होती. ती बारा जणांची नियुक्ती राज्यपालांनी करावी. त्यातून राज्यपालांचा एक सकारात्मक संदेश राज्यात जाईल, असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ( Jayant Patil Taunt Bhagatsingh Koshyari In Vidhan Sabha ) काढला.

जयंत पाटील म्हणाले की, गेले दीड वर्ष महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षाची निवड व्हावी, अशी विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना करत होतं. आम्हाला माहीत नाही ते कशाची वाट पाहत होते. मात्र, राज्यात सत्तापालट झाल्यानंतर लगेच त्यांनी विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी परवानगी दिली. कदाचित ते सत्तापालट होण्याची वाट पाहत होते का?, असा टोलाही पाटील यांनी राज्यपालांना लगावला आहे.

हेही वाचा-Jayant Patil : 'कदाचीत ते सत्तापालट होण्याची वाट...'; जयंत पाटलांचा राज्यपालांना टोला

Last Updated : Jul 4, 2022, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details