महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्य सरकार केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात व्यस्त, शेतकऱ्यांकडे त्यांचे लक्ष नाही -फडणवीस

शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामध्ये हे सरकार मशगुल असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे. (शुक्रवारी 20 ऑगस्ट)रोजी सुभाष जाधव या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्‍न केला होता. या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान रविवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याबाबात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

By

Published : Aug 23, 2021, 4:04 PM IST

Updated : Aug 23, 2021, 4:35 PM IST

मुंबई -राज्य सरकारला शेतकऱ्यांचे ऐकण्यासाठी कोणतीही यंत्रणा उभी केलेली नाही. शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला नाही. केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यामध्ये हे सरकार मशगुल असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे. (शुक्रवारी 20 ऑगस्ट)रोजी सुभाष जाधव या शेतकऱ्याने मंत्रालयाच्या गेटवर विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्‍न केला होता. या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान रविवारी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. त्याबाबात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस बोलत होते. दरम्यान, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना तात्काळ राज्य सरकारने मदत केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना

'ज्यांना जत्रेचा अनुभव आहे त्यांना दुसरे काहीही दिसत नाही'

'महाविकास आघाडी सरकार हे चुकून सत्तेत आलेले आहे. मात्र, सत्ता आल्यानंतर गुळाच्या ढेपेला ज्याप्रमाणे मुंगळे चिकटतात, त्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारचे नेते सत्तेला चिकटले आहेत.' असा टोला राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. नव्याने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झालेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. या जन आशीर्वाद यात्रेवर टीका करताना शिवसेनेने ही जन आशीर्वाद यात्रा नसून जत्रा आहे, अशी टीका केली. मात्र 'ज्यांना जत्रेचा अनुभव आहे त्यांना दुसरे काहीही दिसत नाही' असा उपहासात्मक टोलाही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी शिवसेनेला लगावला आहे.

शेतकरी आत्महत्या प्रश्न आजचा नाही- वडेट्टीवार

मंत्रालयासमोर शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्‍न केला ही घटना दुर्दैवी आहे. मात्र, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा आजचा उद्भवलेला नाही. मागच्या सरकारच्या काळातही अशा काही घटना घडल्या होत्या. मात्र, यामध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप करून काहीही उपयोग होणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. शेतकऱ्याला उभा केले पाहिजे असे मत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे.

Last Updated : Aug 23, 2021, 4:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details