महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख; मुख्यमंत्र्यांसह अनेक दिग्गज भरणार अर्ज

अनेक ठिकाणी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले असून, आज दि ४ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 27 सप्टेंबरला सुरू झालेली ही प्रक्रिया आज दुपार पर्यंत संपुष्टात येईल.

आज दि ४ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

By

Published : Oct 4, 2019, 8:01 AM IST

मुंबई - निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर संपूर्ण राज्यभर एबी फॉर्म वाटपासह उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची रीघ लागली. अनेक ठिकाणी उमेदवारांनी त्यांचे अर्ज दाखल केले असून, आज दि ४ ऑक्टोबरला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 27 सप्टेंबरला सुरू झालेली ही प्रक्रिया आज दुपार पर्यंत संपुष्टात येईल.
अर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार (7 ऑक्टोबर) असून, मतदानाची तारीख 21 ऑक्टोबर आहे.

आज राज्यभरात दिग्गज नेते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यांमध्ये नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवारी दाखल करणार असून, बारामतीतून राष्ट्रवादीचे अजित पवार उमेदवारी भरणार आहेत. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे त्यांच्या पारंपारिक येवला मतदारसंघातून अर्ज भरणार आहेत.

हेही वाचाMAHA VIDHAN SABHA : मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला, नारायण राणेंचे बंड अन् राज ठाकरेंचा शिवसेनेला राम-राम

नुकतेच भाजपवासी झालेले खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणार आहेत. यांसोबतच काँग्रेसला रामराम ठोकून भारतीय जनता पक्षात स्थिरावलेले काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करणार आहेत.

मुंबई उपनगरातील ऐरोली मतदारसंघातून भाजपचे गणेश नाईक अर्ज भरणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details