महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष: नायगाव बीडीडी चाळ प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय अखेर एल अँड टी'कडून रद्द

हातावर हात धरून बसावे लागते असल्याने एल अँड टीने काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार म्हाडाला पत्र पाठवत प्रकल्प सोडत असल्याचे कळवत म्हाडाला दणका दिला.

म्हाडा
म्हाडा

By

Published : Dec 7, 2020, 10:43 PM IST

मुंबई- राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय अखेर कंत्राटदार एल अँड टी कंपनीने मागे घेतला आहे. ही माहिती म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी 'ईटीव्ही भारत' ला दिली आहे. एल अँड टीचा हा निर्णय म्हाडा, राज्य सरकार आणि नायगाव बीडीडीवासीयांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग या तीन चाळीचा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून केला जात आहे. त्यानुसार वरळीचा पुनर्विकास टाटा हाऊसिंग, ना. म.जोशींचा पुनर्विकास शापुरजी पालनजी तर नायगावचा पुनर्विकास एल अँड टीकडून केला जात आहे. 3 वर्षापूर्वी या प्रकल्पाला सुरुवात झाली. पण अजूनही बांधकामाला काही सुरुवात झालेली नाही. सध्या, पात्रता निश्चितीचे काम सुरू आहे. पण हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. तर काही ठिकाणी रहिवाशांनी पात्रता निश्चितीला विरोध केला असून ही प्रक्रियाच थांबली आहे. एकूणच 3 वर्षात पुनर्विकासाचे काम पुढे जात नसून पात्रता निश्चितीमधेच प्रकल्प अडकला आहे. तर आता ही पात्रता निश्चिती कधी पूर्ण होणार आणि प्रकल्प कधी मार्गी लागणार हा मोठा प्रश्न आहे.

संबंधित बातमी वाचा-बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात घोटाळा? सर्व्हे रद्द करण्याची मागणी

म्हणून एल अँड टीने घेतला माघार घेण्याचा घेतला होता निर्णय

प्रकल्पाचे कंत्राट मिळून 3 वर्षे झाली तरी अजून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात मात्र झालेली नाही. तर पात्रता निश्चिती कधी पूर्ण होणार याचे उत्तर कुणाकडे नाही. त्यामुळे कंत्राट मिळूनही काम काही करता येत नसल्याने एल अँड टी कंपनीकडून नाराजी व्यक्त झाली होती. तर हातावर हात धरून बसावे लागते असल्याने एल अँड टीने काही दिवसांपूर्वी या प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार म्हाडाला पत्र पाठवत प्रकल्प सोडत असल्याचे कळवत म्हाडाला दणका दिला. प्रकल्पाला ब्रेक लागला. ही बाब म्हाडाकडून गुलदस्त्यात ठेवत एल अँड टीला निर्णय मागे घेण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरू होते. पण एल अँड टी ने प्रकल्पातून माघार घेतल्याची माहिती 'ईटीव्ही भारत' ला मिळाली आणि सर्व प्रथम 'ईटीव्ही भारत'ने नायगाव प्रकल्पातून एल अँड टीने माघार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्त प्रसिद्ध होताच एकच खळबळ उडाली. नायगाववासीय नाराज झाले.

संबंधित बातमी वाचा-Exclusive : नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील एल अँड टी कंपनीचे कंत्राट होणार रद्द!

एल अँड टीची मनधरणी करण्यास सुरुवात-
एल अँड टीने प्रकल्पातून माघार घेतल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घेतली. एल अँड टीने माघार घेतल्याने प्रकल्प रखडणार होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी एल अँड टीची मनधरणी करण्याची सूचना म्हाडाला केली. या सूचनेनुसार म्हाडाने एल अँड टीच्या अधिकाऱ्यांबरोबर अनेक बैठका घेतल्या आहेत. पण, ही कंपनी ऐकायला तयार नव्हती. प्रकल्पातून माघार घडण्याच्या मागणी वर ठाम होती. पण, आता मात्र कंपनीची मनधरणी करण्यात म्हाडाला यश मिळाले आहे.

एल अँड टीच्या या निर्णयामुळे म्हाडाला मोठा दिलासा मिळाला आहे. तेव्हा आता पात्रता निश्चितीला वेग देत प्रकल्प मार्गी लावण्यात येणार असल्याचेही म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details