अभिनेत्री क्रांती रेडकरने लाँच केला स्वतःचा ब्रँड, दिलं मुलीचं नाव
अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या नवीन इनिंगला आता सुरुवात केली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका पार्टीत तिने स्वतः चा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. तिच्या दोन जुळ्या मुली 'झिया' आणि 'झ्यादा' यांच्या नावाच्या आद्यक्षरांवरून 'झी-झी' असे नाव तिने या आपल्या ब्रँडला दिले आहे.
अभिनेत्री क्रांती रेडकरने लाँच केला स्वतःचा ब्रँड, दिलं मुलीचं नाव
मुंबईः अभिनेत्री क्रांती रेडकरने तिच्या नवीन इनिंगला आता सुरुवात केली आहे. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या एका पार्टीत तिने स्वतः चा कपड्यांचा ब्रँड लाँच केला आहे. तिच्या दोन जुळ्या मुली 'झिया' आणि 'झ्यादा' यांच्या नावाच्या आद्यक्षरांवरून 'झी-झी' असे नाव तिने या आपल्या ब्रँडला दिले आहे.
क्रांतीला आपल्याला स्टायलिंगची उत्तम जाण असल्याचे बऱ्याच दिवसांपासून जाणवत होते. मात्र, या आवडीचं व्यवसायात रूपांतर करण्याचे धाडस नव्हते. मात्र, आता तिने हे शिवधनुष्य पेलायचा निर्णय घेतला असून त्यासाठी लागेल ते सागळं काही करायची तिची तयारी आहे.
कोणत्याही वयाच्या महिलेला आवडतील आणि कोणत्याही प्रसंगी घालता येतील असे कपडे डिझाईन करण्यावर आपला भर असणार असल्याचे तिने सांगितले आहे. काहीसे ट्रॅडिशनल पण तरीही मॉडर्न वाटतील असे कपडे तिने तयार केले असून सुरुवातीला सोशल मीडियाच्या माध्यमातून, ऑनलाइन वेबसाईट्स आणि डिजिटल अँपच्या माध्यमातून हे कपडे ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा तिचा मानस आहे.याशिवाय गरजेनुसार टेलरमेड कपडेही देणार असल्याचे तिने सांगितले आहे. हे कपडे दिसायला सुंदर असले तरीही फार महाग नसतील. सर्वसामान्य आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांना परवडतील अशीच त्यांची किंमत असेल असे क्रांतीने यावंळी स्पष्ट केले आहे.
अमृता खानविलकर आणि अक्षय बरदापुरकर यांनी मिळून सुरू केलेल्या 'प्लॅनेट टी' या उपक्रमा अंतर्गत क्रांतीच्या ब्रॅंडचे पूर्ण पब्लिसिटी आणि प्रमोशन हाताळले जाणार आहे. हा ब्रँड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याची ग्वाही अमृताने यावेळी दिली आहे.