कोल्हापूर - राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे म्हटले आहे. या धक्कादायक घटनेबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्वरित राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक येथे हे आंदोलन झाले. यामध्ये महाविकास आघाडी सरकार विरोधात तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.
'100 कोटीं'च्या लेटर बॉम्ब प्रकरणी भाजपकडून कोल्हापुरात तीव्र निदर्शने
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष चिकोडे पुढे म्हणाले, 'राज्यातील सरकार पडेल, म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशमुख यांचा राजीनामा घेऊ शकत नाहीयेत. त्यामुळे त्यांची यामध्ये मोठ्या प्रमाणात गोची झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्र हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात आहे. त्यामुळे थोडी जरी लाज असेल तर गृहमंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा; तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लाज असेल तर त्यांच्याकडून राजीनामा घ्यावा.'
यावेळी जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे म्हणाले, 'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे वाझेसारख्या एपीआयकडे राज्याचे गृहमंत्री 100 कोटींची खंडणी गोळा करण्याबाबत सांगत असतील तर, एकूणच गृहमंत्र्यांची तसेच महाराष्ट्र शासनाची 'वर'कमाई किती असेल, असा जनतेला प्रश्न पडला आहे. शिवाय हे तिघाडी सरकारने अनैसर्गिक युती केल्यामुळे कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नाहीये. या तिघांनाही माहिती आहे, आपण कोणत्याही क्षणी जाणार आहे. त्यामुळेच हे शक्य तेवढे ओरबाडण्याचे काम करत आहेत,' असेही चिकोडे यांनी म्हटले.
लाज असेल तर गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा