मुंबई - राज्यांमधील विविध पक्षामधील राजकीय नेत्यांची प्रकरणे बाहेर काढणारे भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमैया (Kirit Somaiya visit BMC) यांनी आज मुंबई महानगरपालिका मुख्यालयाला भेट (Visit BMC) दिली. पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणातील (BMC corruption) माहिती गोळा करण्यासाठी सोमैया यांनी ही भेट दिल्याचे समोर आले आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर सोमैया यांच्याकडून पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची प्रकरणे बाहेर काढली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
- शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव -
मुंबईमध्ये गेले दोन वर्षात कोरोनाचा प्रसार आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोनाच्या तीन लाटा आल्या असून नागरिकांच्या सहकार्यामुळे त्या थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. गेल्या दोन वर्षात मुंबईमध्ये १० लाख ५२ हजार १७६ नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून १६ हजार ६६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी पालिकेकडून जंबो कोविड सेंटर, औषधे पुरवठा, मनुष्यबळ पुरवठा, विविध यंत्रसामुग्री, मास्क, पिपीई किट पुरवणे आदींची कंत्राटे देण्यात आली आहेत. या सर्वांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप भाजपकडून सतत केला जात आहे. ही कंत्राटे पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या लोकांनाच देण्यात आल्याचाही आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. हा भ्रष्टाचार बाहेर काढून येत्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा डाव भाजपचा आहे.
- सोमैया पालिका मुख्यालयात -