मुंबई -भाजपचे नेते किरीट सोमैया यांच्या ( Kirit Somaiya Attack Case ) कारवर शनिवारी हल्ला करण्यात आला होता. शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्यात सोमैया जखमी झाले होते. त्याप्रकरणी आता शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना खार पोलिसांनी अटक ( Vishwanath Mahadeshwar Arrested Mumbai Police ) केली होती. अटकेनंतर त्यांना खार पोलिसांनी त्यांना जामीन दिला आहे.
महाडेश्वर यांच्यासोबतच शिवसेनेचे माजी नगरसेवक दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, हाजी आलम यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांनाही पोलिसांनी जामीन मंजूर केला आहे. सोमैयांवर हल्ला करण्यात आला तेव्हा महाडेश्वर घटनास्थळी हजर होते. सोमैया यांच्या कार चालकाने शिवसैनिकांच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच सोमैया यांच्या ड्रायव्हर विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. रॅश आणि बेजबाबदारपणे गाडी चालवण्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.