मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. आज बुधवार दि. 24 ऑगस्ट रोजी विधान परिषदेत मंत्र्यांच्या उपस्थितीवरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी शिंदे सरकारला चांगलेच घेरले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी सभापती महोदय, गृहमंत्री कुठयेत, असा धर्मवीर सिनेमातील डायलॉग मारत देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. MLA Eknath Khadse भाजप आणि शिंदे गटातील मतमतांतरामुळे सत्ताधाऱ्यांचा गोंधळ उडाल्याचे स्थिती आहे. Deputy Chief Minister Devendra Fadnavis यामुळे सभागृह १० मिनिटसाठी तहकूब करावे, अशी मागणी खडसे यांनी केली. दरम्यान, गोंधळ उडाल्याने सभापती नीलम गोऱ्हे यांनी परिषदेचे कामकाज पाच मिनिटसाठी तहकूब केले.
उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री नाहीत - सरकारच्या अनास्थेमुळे विधीमंडळात सभागृहात मंत्र्यांच्या उपस्थितीवरून चांगलाच गदारोळ सुरू झाला आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील हे सरकार विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. विधान परिषदेत देखील आज याचे पडसाद उमटले. विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचे मंत्री नसल्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आक्रमक झाले.
विरोधकांनी एकच गदारोळ घालत सरकारची कोंडी केली प्रश्नाच्या उत्तराला तासाला मंत्री उपस्थित राहत नाहीत. सभागृहात संबंधित खात्याचे मंत्री नाहीत. तर एक प्रश्नाला दुसऱ्याच खात्याचे मंत्री उत्तर देत आहेत. तुमच्याकडे एखादे खाते दिले असेल तर त्या खात्याचा निदान परिचय करून दिला पाहीजे. सामूहिक जबाबदारी असली तरी आम्हाला तुमच्याकडे नेमकी कोणती जबाबदारी आहे, हे कसे माहीत होणार, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला. तसेच गृहमंत्री कुठे आहेत. मागच्या प्रश्नाला देखील मंत्री नव्हते. हा मंत्र्यांचा नव्हे तर प्रश्नोत्तराचा प्रश्न आहे. ज्या खात्याबाबत प्रश्न विचारला आहे, त्या खात्याचे मंत्री नाहीत. सभागृह दहा मिनिटे बंद करा. हे असे चालणार नाही, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी कामकाज तहकूब करायची मागणी केली. खडसे आक्रमकतेमुळे विरोधकांनी एकच गदारोळ घालत सरकारची कोंडी केली.
कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब सभागृहात मंत्री असतील तर प्रश्न उपस्थित करणारे आमदार नसतात. सगळ्यांना सांभाळून घेऊन काम करायला हवे, अशी सारवासारव मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी करण्याचा प्रयत्न केला. शिवसेना आमदार सचिन अहिर यांनी यावरून मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जाब विचारला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभापती नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब केले. सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरोप पाठवला होता, असा खुलासा केला. मात्र, निरोपाच मिळाला नसल्याचे सभापतींनी फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिले.
हेही वाचा - Sahitya Akademi संगीता बर्वे यांच्या पियूची वही या पुस्तकास साहित्य अकादमी पुरस्कार